Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याप्रमाणेच भारताच्या ६ स्टार खेळाडूंच्या संसारातही आलेला भूकंप

Hardik Pandya and Natasa Stankovic separation - हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांनी ४ वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय काल घेतला. २०१८ मध्ये त्यांची पहिली भेट झाली आणि २०२० मध्ये या दोघांनी नातं जगजाहीर केलं होतं.
Hardik Panndya Natasa Divorce
Hardik Panndya Natasa Divorcesakal
Updated on

Hardik and Natasa divorce Alimony - भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांनी ४ वर्षांच्या संसाराला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही सोशल मीडियावरून घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली. हार्दिक व नताशा यांनी तीन वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केलं आणि या दोघांचा लग्नसोहळ्याचा थाट राजेशाही होता. तरीही या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला, याचे उत्तर मिळालेले नाही.

मुंबईच्या नाईट क्लबमध्ये २०१८ साली हार्दिक व नताशा यांची भेट झाली. एका कॉमन मित्राने ही ओळख करून दिल्यानंतर हार्दिक पाहताच क्षणी नताशाच्या प्रेमात पडला.. तिला पहिल्याच भेटीत हात मिळवण्याएवजी त्याने मिठी मारली. २०२० मध्ये दोघांनी लग्न केलं आणि काल घटस्फोट झाला. मात्र, घटस्फोटाचा अनुभव घेणारा हार्दिक हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू नाही. असे अनेक भारतीय क्रिकेटपटू आहेत जे त्यांचे लग्न टिकले नाही. घटस्फोटाच्या जखमेतून गेलेल्या काही भारतीय क्रिकेटपटूंबाबत जाणून घेऊयात...

Hardik Panndya Natasa Divorce
हॅट्स ऑफ पांड्या! वैयक्तिक आयुष्यात 'वादळ' असूनही तू शांत राहिलास अन् देशाला वर्ल्ड कप जिंकून दिलास!
Indian cricket stars whose marriages ended in divorce
Indian cricket stars whose marriages ended in divorcesakal

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी

शिखर धवनने २०१२ मध्ये आयेशा मुखर्जीशी लग्न केले. ११ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला. संपूर्ण वैवाहिक जीवनात धवनने त्याची पत्नी आयेशा मुखर्जीला सतत पाठिंबा दिला. पण, कालांतराने त्यांचे नाते बिघडले, ज्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत आणि धवनने त्यांचाही सांभाळ केला होता. आयेशा व शिखर यांना झोरावर नावाचा मुलगा आहे आणि तो सध्या आयेशासोबत लंडनमध्ये असतो.

Indian cricket stars whose marriages ended in divorce
Indian cricket stars whose marriages ended in divorce sakal

विनोद कांबळी आणि नोएला लुईस

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचाही घटस्फोट झाला. १९९८ मध्ये कांबळीने त्याची बालपणीची मैत्रीण नोएला लुईससोबत सेंट पॅट्रिक कॅथेड्रल, पूणे येथे लग्न केले. नोएला लुईस यांनी पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले. कांबळीने नंतर माजी मॉडेल अँड्रिया हेविटशी लग्न केले आणि युनियनसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे.

Indian cricket stars whose marriages ended in divorce
Indian cricket stars whose marriages ended in divorcesakal

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ

भारताचा चॅम्पियन जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्याही वैयक्तिक आयुष्यात असेच वादळ आले आहे. त्यानेही घटस्फोटीत हसीन जहाँसोबत लग्न केलं होतं. पण, हसीन जहाँने शमी व त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. २०१२ च्या आयपीएल हंगामात शमीची माजी मॉडेल आणि चीअरलीडर हसीन जहाँशी भेट झाली. दोघांनी दोन वर्षे डेट केले आणि २०१४ मध्ये लग्न केले होते. त्यांनी २०१५ मध्ये एका मुलीचे स्वागत केले. दोन वर्षांनंतर हसीन जहाँने शमीवर विवाहबाह्य संबंधांचा आरोप केले. या आरोपामुळे आणखी गुंतागुंत निर्माण झाली आणि तेव्हापासून हे जोडपे वेगळे झाले.

Hardik Panndya Natasa Divorce
Hardik Pandya-Natasa Divorce : आता हार्दिक पांड्याच्या संपत्तीचे काय होणार... नताशा किती पोटगी घेणार? जाणून घ्या A टू Z

जवागल श्रीनाथ आणि ज्योत्स्ना

मैसूर एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथ याच्या आयुष्यातही हे वादळ आले आहे. भारताकडून ६७ कसोटी, २२९ वन डे सामन्यांत अनुक्रमे २३६ व ३१५ विकेट्स जवागल श्रीनाथच्या नावावर आहेत. त्याने १९९९ मध्ये ज्योत्स्नासोबत लग्न केलं, परंतु २००७ मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षांनी श्रीनाथने पत्रकार माधवी पत्रावलीसोबत लग्न केलं. श्रीनाथ सध्या आयसीसीचा सामनाधिकारी म्हणून काम करतोय.

Indian cricket stars whose marriages ended in divorce
Indian cricket stars whose marriages ended in divorce sakal

मोहम्मद अझरुद्दीन व संगिता बिजलानी

भारतीय संघाचा स्टायलिस्ट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने अनेक सामने गाजवले. आपल्या शैलीदार फलंदाजीने त्याने स्वतःची वेगळी ओळख तयार केली होती. मोहम्मद अझरुद्दीनने १९९६ मध्ये पहिली पत्नी नौरीन हिला घटस्फोट देऊन बॉलिवूड अभिनेत्री संगिता बिजलानीसोबत लग्न केलं. पण, काही वर्षानंतर बिजलानीलाही त्याने घटस्फोट दिला.

Indian cricket stars whose marriages ended in divorce
Indian cricket stars whose marriages ended in divorcesakal

दिनेश कार्तिक व निकिता वंजारा

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज दीनेश कार्तिक याची मैदानावरील कारकीर्द जशी संघर्षमय होती, तसेच त्याच्या वैयक्तीक आयुष्यातही अनेक वादळं आली. पहिली पत्नी निकिता वंजारा हिच्यासोबतच्या सुखी संसाराला नजर लागली. निकिता भारताचा फलंदाज व दिनेशचा मित्र मुरली कार्तिकच्या प्रेमात पडली. दिनेशने निकिताला घटस्फोट दिला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी दिनेशने स्टार स्क्वॉशपटू दिपिका पल्लिकल हिच्यासोबत लग्न केलं. मागील वर्षीच या दोघांना जुळी बाळं झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.