Hardik Pandya : हार्दिक पांड्याचे धमाकेदार पुनरागमन! गोलंदाजीत दाखवली चमक, संघाला मिळवून दिला दणदणीत विजय

१९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध गुडघा दुखावल्यामुळे क्रिकेटपासून दूर राहिलेल्या हार्दिक पंड्याने चार महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.
Hardik Pandya
Hardik Pandyasakal
Updated on

नवी मुंबई : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध गुडघा दुखावल्यामुळे क्रिकेटपासून दूर राहिलेल्या हार्दिक पंड्याने चार महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.

डी.वाय. पाटील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत हार्दिकने अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या रिलायन्स-एक संघाने बीपीसीएल संघाला दोन विकेटने हरवले. या सामन्यात हार्दिकने (२/२२) अशी गोलंदाजीत चमक दाखवली. त्यामुळे बीपीसीएल संघाला १८.३ षटकांत १२६ धावांवर रोखण्यात आले.

Hardik Pandya
Neil Wagner Retires : क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! संघातून वगळल्यानंतर दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती

हार्दिकला देव लाकरा (३/३१) व पियुष चावला (३/१५) यांची साथ मिळाली. प्रत्युत्तरात रिलायन्सने नमन धीर व नेहक वधेरा यांच्या ५१ धावांच्या सलामीने संघाला चांगली सुरुवात करून दिली.

यानंतर मध्यक्रमातील फलंदाजांनी निराशा केल्याने रिलायन्सची अवस्था एक बाद ८७ वरून आठ बाद ११३ अशी बिकट झाली. यानंतर पंड्या व चावला यांनी संयमाने खेळ करीत संघाला १५व्या षटकात विजय मिळवून दिला.

Hardik Pandya
WTC 25 Points Table : इंग्लंडविरुद्ध भारताची विजयी हॅट्ट्रिक; न्यूझीलंड संघात पसरली घबराट, कशी आहे पॉइंट टेबलची स्थिती?

आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गुजरात टायटन्ससाठी दोन हंगाम गाजवल्यानंतर मुंबईने हार्दिकला विकले. आयपीएल लिलावापूर्वी मुंबईने जाहीर केले होते की यावेळी संघाची कमान रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.