Hardik Pandya IPL 2024 : अरे भाई अ‍ॅडजस्ट नही होता हैं.... गुजरात टायटन्स सोडणाऱ्या पांड्याचा VIDEO लिक?

Hardik Pandya Leak Video : हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा पीआर व्हिडिओ आहे की खरंच पांड्या एवढे नखरे करतो याबाबत चर्चा सुरू आहे.
Hardik Pandya IPL 2024
Hardik Pandya IPL 2024 esakal
Updated on

Hardik Pandya IPL 2024 : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएलचा तारीख जाहीर होताच प्रकाश झोतात आला आहे. आयपीएलचा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णदार बनवलं आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम वादळी होणार अशी शक्यता आहे.

Hardik Pandya IPL 2024
Sachin Tendulkar VIDEO : सचिन भेटला क्रिकेटच्या खऱ्या हिरोला... काश्मीर ट्रिप केली 'यादगार'

दरम्यान, हार्दिक पांड्याचा एक कथित लिक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हार्दिक पांड्या एका शूटवेळी सेटवर शेफ आणि न्युट्रिशनची मागणी करताना दिसतोय. तो गुजरातची शान असलेल्या जिलेबी आणि ढोकळ्याला नाकं मुरडताना दिसतोय.

या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. काही चाहते तर आयपीएलपूर्वीचा हा पीआर स्टंट असल्याचे मत व्यक्त करत आहेत.

Hardik Pandya IPL 2024
Ind vs Eng Test Cricket : गमावण्यासाठी काहीच नाही : आकाशदीप

दरम्यान, भारताचा माजी विकेटकिपर पार्थिव पटेलने आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना हार्दिक पांड्यावर मोठा दबाव असणार आहे असं सांगितलं. जिओ सिनेमावर बोलताना पार्थिव म्हणाला की, 'हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी हा यंदाच्या हंगामात चर्चेचा विषय असणार आहे. ज्या प्रकारे त्याने गुजरात टायटन्सला पहिल्या वर्षी विजेतेपद पटकावून दिलं. पुढच्या वर्षी फायनलमध्ये शेवटपर्यंत सामना रंगला. त्याने चांगल्या प्रकारे गुजरात टायटन्सचे नेतृत्व केलं.'

पार्थिव पुढे म्हणाला की, 'हार्दिक आता पुढे गेला आहे. तो मुंबईत परतला असून त्याने दुखापतीनंतर क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली आहे. त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण मुंबईने ट्रॉफी जिंकून बराच काळ लोटला आहे.'

'मुंबई इंडियन्सासाठी फक्त प्ले ऑफसाठी पात्र होणं हे यश नाही. त्यांना ट्रॉफी जिंकायची आहे. याचाच ते विचार करत आहेत. त्यामुळे हार्दिकला संघात घेणं आणि कर्णधार करणं हा योग्य आणि पुढचा विचार करून घेतलेला निर्णय आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.