Natasa Stankovic first post Hardik Pandya reacts - भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची बातमी चाहत्यांना दिली. ४ वर्षांच्या सुखी संसारानंतर या दोघांनी सहमताने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नताशा मुलगा अगस्त्याला सोबत घेऊन तिच्या घरी म्हणजेच सर्बियामध्ये गेली आहे. घटस्फोटानंतर नताशाने काल इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला अन् आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावर हार्दिक रिॲक्ट झाला.
अगस्त्यासोबत गेल्या आठवड्यात सर्बियातील तिच्या मूळ गावी मुंबई सोडून गेलेल्या नताशाला या आव्हानात्मक काळात तिच्या कुटुंबियांकडून सांत्वन मिळत आहे. नताशा आणि हार्दिक यांनी त्यांच्या विभक्त होण्याची माहिती सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली. त्यात त्यांनी लिहिले की, “४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि हार्दिकने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्रितपणे सर्वतोपरी प्रयत्न केले. पण, हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा असल्याचा विश्वास आम्हाला आहे. आम्ही एकत्र मिळून आनंद, परस्पर आदर आणि साहचर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. पण, तो घेणे आमच्यासाठी कठीण होता."
नतासा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या ३१ मे २०२० रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजांनी लग्न केले होते. सह-पालकत्वाच्या त्यांच्या वचनबद्धतेवर जोर देऊन, ही दोघं म्हणाले, “आम्ही अगस्त्याला आशिर्वाद देत आहोत, जो आमच्या दोघांच्याही केंद्रस्थानी राहील. त्याच्यासाठी जे काही करू शकतो ते सर्व आम्ही करू याची खात्री करण्यासाठी आम्ही सह-पालक राहू.''
विभक्त झाल्यानंतर नताशाने तिची पहिली इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये ती आणि तिचा मुलगा अगस्त्या हे सर्बियामधील थीम पार्कमध्ये मजा करताना दिसत आहेत. या पोस्टवर हार्दिक पांड्याने हार्ट इमोजी पोस्ट केली.
हार्दिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशाला ट्रोल केले गेले. पण, हार्दिकच्या या कृतीने तिच्यावरील नकारात्मकता कमी होण्यास मदत नक्की होईल. एका चाहत्याने लिहिले की, कृपया नताशाबाबत राग व्यक्त करणं बंद करा.. हार्दिकच्या मनातही तिच्याप्रती राग नाही. हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे आणि हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे त्याचा आदर करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.