India Squad for Sri Lanka Tour Updates: टीम इंडियामध्ये आता एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. भारताचा पुढचा टी-20 कर्णधार कोण असेल? सध्या क्रिकेटविश्वातील हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी संघांची घोषणा होण्यास उशीर होण्यामागे कदाचित हेच कारण असेल.
विविध अहवालांनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) बुधवारी संघांची घोषणा करणार होते, परंतु हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात कर्णधार कोण असेल? या विषयावर एकमत होऊ न शकल्याने ही घोषणा आणखी एक दिवस पुढे ढकलण्यात आली. भारतीय संघाची घोषणा गुरुवारी (18 जुलै) होऊ शकते.
गेल्या महिन्यात भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर कर्णधार म्हणून फक्त हार्दिक पांड्या या शर्यतीत होता, पण आता नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पदभार स्वीकारल्यानंतर मोठी उलथापालथ दिसत आहे. गेल्या वर्षी हार्दिकच्या दुखापतीनंतर संघाची धुरा सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादवकडे टी-20मध्ये संघाचे नेतृत्व जाण्याची शकता आहे.
दरम्यान, सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 टी-20 मालिका जिंकली. याव्यतिरिक्त, नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर हा हार्दिकच्या तंदुरुस्तीबद्दल चिंतेत आहे कारण अष्टपैलू पाठीच्या आणि घोट्याच्या दुखापतींसह संघर्ष करत असतो.
अनेक अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की, गंभीरने दिल्लीहून व्हिडिओ कॉलवर बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याशी बैठक घेतली, जिथे त्यांनी पुढे जाण्याच्या दृष्टिकोनावर चर्चा केली, परंतु टी-20 कर्णधारपदावर कोणताही निर्णय घेतला जाऊ शकला नाही.
सूर्यकुमार यादवला टी-20मध्ये संघाचे नेतृत्व मिळावी, अशी गंभीरची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शाह यांनी हार्दिकचे समर्थन केले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना या दौऱ्यासाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
पण बुधवारी क्रिकबझच्या अहवालात असे दिसून आले आहे की, रोहित तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी स्वतःला उपलब्ध करून देऊ शकतो. टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर राहुल द्रविडच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरचा श्रीलंका दौरा ही पहिली असाइनमेंट असेल. या दौऱ्याची सुरुवात 27 जुलै रोजी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्याने होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.