Hardik Pandya out from Sri Lanka tour: भारतीय संघ येत्या काही दिवसांत श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. राहुल द्रविड याच्यानंतर गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा असणार आहे. ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांच्या या मालिकेला २६ जुलैपासून सुरुवात होत आहे आणि भारतीय संघ २२ जुलैला त्यासाठी रवाना होईल. या दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा व विराट कोहली यांनी ट्वेंटी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याने ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya Captain) जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना बडोद्याच्या या खेळाडूने वन डे मालिकेतून माघार घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. हार्दिकने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे रोहितनंतर टीम इंडिया हार्दिककडे कर्णधार म्हणून पर्याय पाहत आहे. पण, हार्दिकने या दौऱ्यावरील वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे BCCI ला कळवले आहे,असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ हुकल्यानंतर, राष्ट्रीय निवडकर्त्यांनी ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये पांड्याला कर्णधारपद देण्याचे ठरवले होते, परंतु अष्टपैलू खेळाडूच्या वारंवार दुखापतींमुळे त्यांचे मत बदलले. रोहितच्या गैरहजेरीत हार्दिकने भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळले होते. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पांड्या बरा झाला आणि त्याने रोहितच्या नेतृत्त्वाखालील वर्ल्ड कप स्पर्धा गाजवली. आता तो ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियाचे पुन्हा नेतृत्व सांभाळताना दिसेल.
दरम्यान, हार्दिकने श्रीलंका दौऱ्यातील वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. India vs Sri Lanka वन डे मालिका २ ते ७ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. पण, हार्दिकने वैयक्तिक कारणास्तव या मालिकेत खेळू शकत नसल्याचे बीसीसीआयला सांगितले आहे. हार्दिक व पत्नी नताश स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. याबाबत दोघांकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी काही तरी नक्की गडबड असल्याचे संकेत दोघांकडून अप्रत्यक्षपणे मिळाले आहेत.
गौतम गंभीरने या मालिकेत रोहित, विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना खेळण्यास सांगितले आहे. या दौऱ्यावर २६, २७ व २९ जुलै असे तीन ट्वेंटी-२० सामने होणार आहेत, तर १, ४ व ७ ऑगस्टला वन डे सामने होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.