Haris Rauf Controversy : रौऊफच्या 'त्या' प्रकरणात रिझवान पाठीशी राहिला उभा, मात्र भारतीय चाहत्यांनी केला आडवा

Mohammad Rizwan : मोहम्मद रिझवानचं रौऊफच्या समर्थनात केलेलं ट्विट भारतीय चाहत्यांना रूचलं नाही. चाहत्यांना त्याला फैलावरच घेतलं
Mohammad Rizwan
Haris Rauf Controversyesakal
Updated on

Haris Rauf Controversy : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौऊफ आणि पाकिस्तानी चाहत्याचे युएसमध्ये भांडण झालं होतं. हारिस रौऊफ हा त्या चाहत्याच्या अंगावर धावून गेला. एवढच नाही तर हारिसने तू भारतीय चाहता आहेस का अशी विचारणा देखील केली. मात्र तो चाहता निघाला पाकिस्तानचा!

दरम्यान, हारिस रौऊफचा हा वादग्रस्त व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर हारिस रौऊफला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंची रांग लागली. विकेटकिपर बॅट्समन मोहम्मद रिझवानने देखील हारिस रौऊफला पाठिंबा देणारं ट्विट केलं. मात्र हे ट्विट त्याच्यावरच उलटलं. ट्विटमध्ये भारताचं नाव घेणं त्याला महागात पडलं. त्याला भारतीय चाहत्यांनी चांगलेच धारेवर धरले.

Mohammad Rizwan
Team India: वर्ल्ड कपनंतर 'या' दिग्गजांचा पत्ता कट... श्रेयस अय्यरसह 7 खेळाडूंची होणार टीम इंडियात एंट्री

दरम्यान, या ट्विटनंतर भारतीय चाहत्यांनी मोहम्मद रिझवानला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. एका युजरने रिझवानच्या ट्विटला उत्तर देत लिहिले की, 'त्या व्यक्तीने पाकिस्तानी असल्याचं मान्य केलं मात्र तरी देखील तू भारताचं नाव घेतलस कारण तू तोच घाणेरडा पीआर गेम खेळत आहेस. जो गेम तू 2021 मध्ये मोहम्मद शमीविरूद्ध खेळला होता. तू या पृथ्वीतलावरील लाज नसलेला खेळाडू आहेस.'

Mohammad Rizwan
Gautam Gambhir: गौतम गंभीर कोच झाल्यावर बदलणार टीम इंडियाचे चित्र; रोहित-विराटचं भविष्य काय?

मोहम्मद रिझवानने ट्विट केले की, 'हारिस रौऊफबद्दल अपमानजनक बोलणारा पाकिस्तानचा होता की भारताचा हा विषय महत्वाचा नाही तर त्या व्यक्तीकडे मुल्य आणि सभ्यपणा नव्हता हे महत्वाचं. कोणालाही कोणत्याही माणसाचा त्याच्या कुटुंबासमोर अनादर करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारचे कृत्य थांबले पाहिजे. सहिष्णुता, आदर आणि जिव्हाळा या सारखी मुल्ये खूप दुर्मिळ झाली आहेत.'

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.