Harmanpreet Kaur: भारतीय महिलांचा कसोटीत मोठा पराक्रम! हरमनप्रीत असा कारनामा करणारी बनली पहिलीच कर्णधार

Harmanpreet Kaur: महिला संघाने आफ्रिकन महिला संघाविरुद्ध घरच्या मैदानावर एक सामन्याची कसोटी मालिका खेळली. , सामनाही 10 विकेटने आपल्या नावावर केला. या विजयासोबत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने महिला टेस्ट क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे.
Harmanpreet Kaur
Harmanpreet KaurEsakal
Updated on

सध्या पुरुषांसोबतच महिला क्रिकेट संघाचीही भारतीय क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळत आहे. एकीकडे पुरुष संघाने T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले, तर दुसरीकडे महिला संघाने आफ्रिकन महिला संघाविरुद्ध घरच्या मैदानावर एक सामन्याची कसोटी मालिका खेळली. , सामनाही 10 विकेटने आपल्या नावावर केला. या विजयासोबत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने महिला टेस्ट क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने यापूर्वी एकदिवसीय मालिकेत आफ्रिकेचा 3-0 असा पराभव केला होता, तर कसोटीतही त्यांची अशीच कामगिरी पाहायला मिळाली. या विजयासह कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरने असा पराक्रम केला आहे जो महिला कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी कोणत्याही कर्णधाराला करता आला नव्हता.

Harmanpreet Kaur
Rohit Sharma: रोहितने टी20 वर्ल्ड कप विजयानंतर का चाखलेली खेळपट्टीवरील माती? स्वत:च केला खुलासा; पाहा Video

कर्णधार म्हणून पहिल्या 3 कसोटी जिंकणारी हरमनप्रीत कौर ठरली पहिली खेळाडू

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने गेल्या वर्षी मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता ज्यात संघाने विजय मिळवला होता आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचाही पराभव केला होता. आता, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटी जिंकून, हरमनप्रीत कौर महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिली कर्णधार बनली आहे जिच्या नेतृत्वाखाली संघाने सलग 3 सामने जिंकले आहेत.

त्याच वेळी, हरमनप्रीतने भारतीय महिला संघाची दिग्गज माजी खेळाडू मिताली राजच्या कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजयांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाने तिन्ही सामने जिंकले, तर मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने 8 कसोटी सामने खेळले ज्यात 3 जिंकले.

Harmanpreet Kaur
Team India to leave Barbados : जल्लोषाची तारीख ठरली! वर्ल्ड कपची ट्रॉफी 'या' दिवशी येणार भारतात, लागा तयारीला

महिलांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात एका सामन्यात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा

चेन्नईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या आणि दुसऱ्या डावात 603 आणि 37 धावा केल्या, तर आफ्रिकन महिला संघाने आपल्या दोन्ही डावात 266 आणि 373 धावा केल्या. यासह, या कसोटी सामन्यात एकूण 1279 धावा झाल्या, जे महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत पहिल्या स्थानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या वर्षी नॉटिंगहॅम मैदानावर खेळला गेलेला कसोटी सामना आहे ज्यामध्ये एकूण 1373 धावा झाल्या होत्या.

Harmanpreet Kaur
सगळं खरं पण... रोहित अन् विराट टीम इंडियासाठी पुढचा सामना कधी अन् कुठे खेळणार? जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.