Womens T20I World CUP: 'ऑस्ट्रेलिया एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही, तर...', भारताच्या पराभवानंतर काय म्हणाली हरमनप्रीत?

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरूद्धचा महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपधील सामना भारताने ९ धावांनी गमवला.
harmanpreet kaur
harmanpreet kauresakal
Updated on

IND vs AUS T20I Womens: आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताला उपांत्य फेरीमध्ये पोहचण्यासाठी एका विजयाची गरज होती. परंतु कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भाराताचे उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण आता इतर देशांवर अवलंबून आहे. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु भारताला ९ धावांनी सामना गमवावा लागला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १५२ धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने ५४ धावांची नाबाद खेळी केली. परंतु तिला दीप्ती शर्मा व्यतिरीक्त इतर कोणाचीही साथ मिळाली नाही. भारताच्या या पराभवावर हरमनप्रीत म्हणाली की," मला वाटते सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ योगदान देता, ते एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून राहत नाहीत. त्यांच्याकडे अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत, जे सामन्यामध्ये चांगले योगदान देतात."

harmanpreet kaur
खूब लड़ी मर्दानी! Harmanpreet Kaur ची मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार फिफ्टी

"आम्ही देखील चांगले नियोजन केले होते, परंतु त्यांनी आम्हाला सहज धावा घेऊ दिल्या नाहीत. ही त्यांची एक अनुभवी बाजू आहे, जी तुमच्या नियंत्रणात नसते. त्यामुळे एक दोन खेळाडू खेळले नाहीत, तरी तुम्हाला नेहमीच तयार राहावे लागते." हरमनप्रीत म्हणाली.

"राधाने खरोखरच चांगली गोलंदाजी केली, ती चांगले क्षेत्ररक्षणही करत होती. संघात तुम्हाला अशा खेळाडूची गरज असते. सामन्यातील लक्ष हे पूर्ण कण्याजोगे होते. परंतु, मी आणि दीप्ती फलंदाजी करत असताना आम्ही काही सोपे चेंडू खेळू शकलो नाही. ऑस्ट्रेलिया संघाकडून आपण खूप काही शिकू शकतो. आम्हाला जर दुसरा सामना खेळण्याची संधी मिळाली, तर चांगली गोष्ट आहे. पण उपांत्य फेरीमध्ये तोच संघ जाईल जो तिथे जाण्यास पात्र असेल.” ती पुढे म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.