Rohit Sharma's wife Ritika's pregnancy: सुत्रांच्या माहितीनुसार कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीला मुकणार आहे. अहवालात केवळ वैयक्तिक कारणामुळे रोहित पहिल्या कसोटीला उपस्थित राहू शकत नाही, असे नमूद केले आहे. असे असले तरी, भारतविरुद्ध न्यूझीलंड कसोटीदरम्यान समालोचक हर्षा भोगले यांनी रोहीतच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचे सांगितले. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारत वापरू शकणाऱ्या संयोजनांवर चर्चा करताना, हर्षा भोगले यांनी, 'रोहितची पत्नी रितिका गर्भवती असल्यामुळे रोहित पहिल्या सामन्यात अनुपस्थित राहू शकतो, ' अशी पुष्टी केली.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी समालोचन करताना भोगले म्हणाले, "रोहितच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येणार असल्यामुळे तो कदाचित पहिल्या कसोटीला उपस्थित राहू शतक नाही."
पितृत्व रजेमुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला मुकणारा रोहित हा दुसरा भारतीय कर्णधार ठरेल. यापुर्वी विराट कोहली त्याची मुलगी वामिकाच्या जन्मासाठी २०२१-२२ ची बॉर्डर गावस्कर स्पर्धा सोडून मायदेशी परतला होता. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भरपूर वेळ असल्याने रोहित शर्मा ६ डिसेंबरपासून ॲडलेडमधील दुसऱ्या सामन्यासाठी परतण्याची अपेक्षा आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाची जबाबदारी स्विकारेल. रोहितच्या जागी सलामीवीर म्हणून केएल राहूल मैदानात उतरताना पहायला मिळू शकतो किंवा अभिमन्यू इश्वरनला पदार्पणाची संधी दिली जावू शकते.
रोहित न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खराब फॉर्मशी झुंज देत आहे. अशातच भारत १५ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. याआधीही रोहित ऑस्ट्रेलियाविरूद्ध संघर्ष करताना पहायला मिळाला. मागच्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियात १४ डावांमध्ये ३३ च्या सरासरीने तीन अर्धशतके केली आहेत. तर, रोहितने २०२३ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरूद्ध शतक नोंदवले होते. या मालिकेत त्याची सरासरी ६ डावांमध्ये ४० पेक्षा जास्त होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.