Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होताच हर्षित राणाने दाखवली ताकद! ५ विकेट्स तर घेतल्या, पण फिफ्टीही ठोकली

Harshit Rana shown all-round performance ahead of Australia Tour: २२ वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्यातच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात कमालीचा परफॉर्मन्स देत आपली छाप पाडली आहे.
Harshit Rana shown all-round performance with 5 wickets and fifty
Harshit Rana shown all-round performance with 5 wickets and fiftySakal
Updated on

Harshit Rana in Ranji Trophy: भारताचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात हर्षित राणाचीही निवड झाली असल्याने आता त्याला कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पणाची संधी मिळू शकते.

दरम्यान, त्याच्याकडे प्रथम श्रेणीचा कमी अनुभव असल्याने त्याच्या निवडीवर अनेकांनी शंका घेतली होती. मात्र नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये अष्टपैलू कामगिरी करत त्याने टीकाकारांना सध्यातरी चोख उत्तर दिले आहे.

Harshit Rana shown all-round performance with 5 wickets and fifty
IND vs NZ Test: भारतीयांच्या सरावामध्ये कलात्मकतेचा अभाव; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावण्याचे कारण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.