Gautam Gambhir: 'कोच' गंभीरची कामाला सुरुवात! पहिल्या T20I मालिकेपूर्वी खेळाडूंकडून कसा करून घेतला सराव, पाहा Video

Team India first Practice Session uder Coach Gautam Gambhir: मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरने सुत्रं हाती घेतली असून त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाचे पहिले सराव सत्र नुकतेच पार पडले.
Gautam Gambhir | Team India Head Coach
Gautam Gambhir | Team India Head CoachSakal
Updated on

India vs Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचा ३ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. गौतम गंभीरचा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच दौरा आहे.

दरम्यान, त्याने आता मुख्य प्रशिक्षक म्हणून सुत्रं हाती घेतली असून त्याच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी भारतीय संघाचे पहिले सराव सत्र पार पडले. या सरावादरम्यानचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.

२७ जुलैपासून टी२० मालिकेला सुरूवात होणार आहे. त्याआधी सोमवारी (२२ जुलै) भारतीय संघ श्रीलंकेत पोहचला आहे. यानंतर मंगळवारी सरावाला सुरुवात झाली. टी२० संघाचे नेतृत्व आता सूर्यकुमार यादवच्या हाती सोपवण्यात आले आहे.

Gautam Gambhir | Team India Head Coach
Gautam Gambhir Press Conference: रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळतील का? गौतमचं 'गंभीर' विधान

भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडूंनी मंगळवारी गंभीर आणि त्याच्या सपोर्ट स्टाफच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सराव केला. गौतम गंभीरही खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसला. तो संजू सॅमसनलाही काही टीप्स देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओला बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की 'मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सुत्रं हातात घेतली.'

दरम्यान, श्रीलंका दौऱ्यासाठी गौतम गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये अभिषेक नायर आणि रायन टॅन डोइचेट यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांची सपोर्ट स्टाफमधील निवड पक्की असल्याने यापुढेही ते गंभीरबरोबर काम करतील.

त्याशिवाय साईराज बहुतुले व टी दिलीप हे श्रीलंका दौऱ्यावर सपोर्ट स्टाफ म्हणून गेले आहेत. बहुतुले यांची सध्या फक्त प्रभारी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याची चर्चा आहे, तर राहुल द्रविडच्या सपोर्ट स्टाफमध्ये असलेल्या टी दिलीप यांनी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी कायम केल्याचंही समजत आहे.

Gautam Gambhir | Team India Head Coach
IND vs SL : स्वॅग! गौतम गंभीर युगाची सुरुवात; पाहा टीम इंडियाचा मुंबई टू श्रीलंका प्रवास, Video

श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक -

टी-२० मालिका (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामने सुरू होतील)

  • पहिला सामना - २७ जुलै, पाल्लेकेले

  • दुसरा सामना - २८ जुलै, पाल्लेकेले

  • तिसरा सामना - ३० जुलै, पाल्लेकेले

वनडे मालिकेचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सामने सुरू होतील.)

  • पहिला सामना - २ ऑगस्ट, कोलंबो

  • दुसरा सामना - ४ ऑगस्ट, कोलंबो

  • तिसरा सामना - ७ ऑगस्ट, कोलंबो

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ

वनडे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

टी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

Pratima olkha:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.