ICC ANTI-CORRUPTION Department chief Alex Marshall: जगभरात होत असलेल्या बहुतांश प्रमुख ट्वेंटी-२० लीग सुरक्षित आणि स्वच्छ आहेत, परंतु भविष्यात विविध क्रिकेट मंडळांच्या स्थानिक ट्वेंटी-२० लीगमधून भ्रष्टाचार होऊ शकतो आणि यावर आयसीसीचे थेट नियंत्रण असत नाही, असे स्पष्ट मत आयसीसीचे निवृत्त होत असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अलेक्स मार्शल यांनी व्यक्त केले.
अलेक्स मार्शल यांनी कोणत्याही लीगचा थेट उल्लेख केला नाही किंवा नाव घेतले नाही, परंतु त्यांनी भीती व्यक्त केली. सध्या तुम्ही पाहात असलेले क्रिकेट सुरक्षित आणि पारदर्शक आहे, असे मात्र ठामपणे सांगितले.
एकीकडे सुरक्षित क्रिकेट खेळले जात असले तरी स्थानिक आणि देशांतर्गत लीगमध्ये काही अप्रामाणिक लोक मात्र संधी शोधत असतात. यात आपण सट्टेबाजी, फिक्सिंग किंवा स्पॉट फिक्सिंगसारखे प्रकार कसे करू शकतात याचा विचार करत असतात आणि हे सुमार व्यवस्थापन असलेल्या लीगमध्ये घडू शकते. जेव्हा प्रत्येक गोष्टीत पैसा कमवण्याचा उद्देश असतो, तेव्हा भ्रष्टाचाराची भीती असतेच. कमकुवत बाजूचा शोध घेऊन आपला मार्ग तयार करण्यासाठी हे लोक संधीच शोधत असतात, असे मार्शल यांनी सांगितले.
एलिट स्थरावरील लीगमध्ये खेळणारे खेळाडू आता सजग झाले आहेत. काही सट्टेबाज खेळाडूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे खेळाडू लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याची माहिती देत असतात. त्यामुळे खेळातील पारदर्शकता कायम राहिली आहे. आयसीसीला माहिती देण्याची खेळाडूंची संख्या वाढत आहे, पूर्वी खेळाडूंमध्ये तेवढा आत्मविश्वास नव्हता, परंतु आता परिस्थिती बदलली आहे, असे मार्शल म्हणाले.
आता क्रिकेटमधील भ्रष्टाचार आम्ही उघडा पाडला आहे आणि संबंधितांना धडाही शिकवलेला आहे. अनेक खेळाडूंना आम्ही शिक्षित केले आहे. भ्रष्टाचारी लोकांकडून कशा प्रकारे जाळे टाकले जाऊ शकते, याबाबत आम्ही खेळाडूंना माहिती देतो. त्याचा निश्चितच फायदा झालेला आहे, अशी माहिती मार्शल यांनी दिली.
सट्टेबाजांनी संपर्क साधल्याची माहिती न दिल्याबद्दल आयसीसीने बांगालादेशचा माजी कर्णधार शकिब अल हसन आणि झिम्बाब्वेचा दिवंगत माजी कर्णधार हिथ स्ट्रिक यांच्यावर कारवाई करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागे-पुढे पाहिले नाही. मार्शल यांच्या सात वर्षांच्या कालखंडात अशा अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत.
श्रीलंकेतील लीगमध्ये भ्रष्टाचाराचा प्रकार घडला होता, परंतु मार्शल यांच्या टीमने याची दखल घेत ही लीग आता रुळावर आणली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.