भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे, कारण बऱ्याच काळानंतर भारतीय संघ आपल्या भूमीवर कसोटी सामना खेळणार आहे. मात्र, यादरम्यान चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. हिंदुत्ववादी संघटना हिंदु जनजागृती समितीने भारत-बांगलादेश मालिका रद्द करण्याची मागणी केली आहे.