Gautam Gambhir Salary : टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरचा पगार किती, राहुल द्रविडपेक्षा मिळणार कमी पैसे?

बीसीसीआयने मंगळवारी 9 जुलै रोजी गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याची घोषणा केली.
how much salary gautam gambhir india new head coach
how much salary gautam gambhir india new head coachsakal
Updated on

How Much Salary Gautam Ggambhir India New Head Coach : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या प्रशिक्षक राहुल द्रविडचा करार या स्पर्धेसोबतच संपला आहे. त्यानंतर बीसीसीआयने मंगळवारी 9 जुलै रोजी गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याची घोषणा केली. आता द्रविडच्या जागी आलेल्या या दिग्गजाचा पगार त्याच्यापेक्षा जास्त असेल की कमी हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाच्या मनात असेल.

how much salary gautam gambhir india new head coach
Copa America 2024च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाशी भिडणार कोलंबिया! सेमीफायनलमध्ये उरुग्वेला केले पराभूत

मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी अधिकृतपणे गंभीरच्या नियुक्तीची घोषणा केली, ज्याची दीर्घकाळापासून अपेक्षा होती. मात्र, त्याचा पगार त्याच्या पूर्वसुरी राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांच्या पगाराप्रमाणेच असणे अपेक्षित असले तरी अद्याप त्याचा निर्णय झालेला नसल्याचे कळते.

एका रिपोर्टनुसार, भारतीय संघाचे माजी कोच राहुल द्रविड यांना बीसीसीआयकडून वार्षिक 12 कोटी रुपये पगार मिळत होता. गंभीरलाही तेवढीच रक्कम ऑफर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

how much salary gautam gambhir india new head coach
Euro Cup 2024 : भगव्या वादळाला हरवून इंग्लंडने Euro Cupच्या फायनलमध्ये, ट्रॉफीसाठी 'या' दिवशी स्पेनशी भिडणार

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “गौतमसाठी जबाबदारी, पगार आणि इतर गोष्टी सांभाळणे अधिक महत्त्वाचे होते. 2014 मध्ये रवी शास्त्री यांच्यासारखेच हे प्रकरण आहे ज्यात त्यांना मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या जागी प्रथमच क्रिकेटचे संचालक बनवण्यात आले होते, ज्या दिवशी रवी सामील झाले होते, त्यांच्याकडे करार देखील नव्हता आणि नंतर गोष्टी पूर्ण झाल्या . गौतमच्या बाबतीतही काही तपशीलांवर काम सुरू आहे. त्याचा पगार राहुल द्रविड इतकाच असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.