Women's Cricket: चार वर्षात चार ICC स्पर्धा! महिलांच्या क्रिकेटबाबत झाली मोठी घोषणा, टीम इंडियाचेळी वेळापत्रक जाहीर

ICC announced fourth edition of Women’s Championship : आयसीसीने २०२५ ते २०२९ या चार वर्षांसाठी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची साधारण रुपरेषा काय असेल, हे जाहीर केले आहे.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamSakal
Updated on

ICC announced FTP for Women's international cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी (४ नोव्हेंबर)२०२५ ते २०२९ या चार वर्षांसाठी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची साधारण रुपरेषा काय असेल, हे जाहीर केले आहे.आयसीसीने २०२५-२०२९ साली फ्यूचर टूर्स प्रोग्राम घोषित केला असून यात आयसीसी महिला चॅम्पियनशीपच्या चौथ्या पर्वाचाही समावेश आहे.

गेल्या काही काळापासून वनडे प्रकारत आयसीसी महिला चॅम्पियनशीप स्पर्धा खेळवते. यानुसार दर चार वर्षांनी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी पात्रता ठरवण्यात येते.

दरम्यान, आता चौथ्या पर्वातून २०२९ महिला वनडे वर्ल्ड कपसाठी पात्रता ठरवण्यात येणार आहे. दरम्यान, यंदाच्या पर्वात ११ संघ सहभागी होत आहेत. आत्तापर्यंत १० संघात महिला चॅम्पियनशीप स्पर्धा खेळवली जात होती. पण आता चौथ्या पर्वातून झिम्बाब्वेचा महिला संघ या स्पर्धेत पदार्पण करत आहेत.

India Women Cricket Team
Rishabh Pant विराट कोहलीच्या पुढे गेला, रोहित शर्मालाही फटका बसला; ICC ने केली तशी घोषणा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.