T20 World Cup Umpires and Match Referees: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणारी ही स्पर्धा 29 जूनपर्यंत चालणार असून 55 सामने खेळवले जाणार आहेत. टी20 वर्ल्ड कपच हे नववे पर्व आहे.
दरम्यान, आता ही स्पर्धा सुरू होण्यासाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असताना आयसीसीने पंच आणि सामनाधिकाऱ्यांची (Umpires and Match Referees) यादी जाहीर केली आहे. आयसीसीने सध्या पहिल्या फेरीसाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांची निवड केली आहे. यामध्ये 20 पंच आणि 6 सामनाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या 26 जणांच्या यादीत जयरमन मदनगोपाल, नितीन मेनन, जवागल श्रीनाथ अशा भारतीयांचाही समावेश आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी सर्वोत्तम पंच म्हणून पुरस्कार जिंकणाऱ्या रिचर्ड इलिंगवर्थ यांचाही समावेश आहे.
त्याचबरोबर 2022 मध्ये टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून काम पाहिलेल्या कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, पॉल रायफल यांचीही यंदा देखील निवड झाली आहे. तसेच त्या अंतिम सामन्यात सामनाधिकारी असलेल्या रंजन मुदुगले आणि जेफ क्रो यांचीही निवड झाली आहे.
क्रो हे सर्वाधिक 175 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत सामनाधिकारी म्हणून काम करणारे सामनाधिकारी आहेत. तसेच अँड्र्यू पायक्रॉफ्टही 150 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत काम करणारे सामनाधिकारी यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये बनतील, त्यासाठी ते एकच सामना दूर आहेत.
पंच - ख्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, अल्लाउद्दिन पालेकर, रिचर्ड केटलबरो, जयरमन मदनगोपाल, नितीन मेनन, सॅम नोगाज्स्की, अहसान रझा, रशीद रियाझ, पॉल रायफेल, लँगटन रुसेरे, शाहिद सियाकत, रोडनी टकर, ॲलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन आणि आसिफ याकूब.
सामनाधिकारी - डेव्हिड बून, जेफ क्रो, रंजन मदुगले, अँड्र्यू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि जवागल श्रीनाथ
दरम्यान, यंदाच्या टी२० वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच 20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका, वेस्ट इंडिज, ओमान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , बांगलादेश आणि नेदरलँड्स असे 20 संघ सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या 20 संघांची चार गटांमध्ये विभागणी केली आहे. पहिल्या फेरीनंतर चार गटांमधून प्रत्येकी 2 संघ सुपर 8 फेरीत जातील. या आठ संघांचीही दोन गटात विभागणी होईल. त्यातून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात खेळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.