ICC च्या मोठ्या पुरस्कारासाठी तीन भारतीय क्रिकेटर्सला नामांकन, पण इंग्लड-श्रीलंकेच्या खेळाडूंकडून मिळणार टक्कर

ICC Player of The July 2024 month: आयसीसीने जुलै २०२४ महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर केली असून यात तीन भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
Team India
Team IndiaSakal
Updated on

ICC Awards: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दर महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूला पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी दोन्ही गटातून तीन-तीन खेळाडूंना आधी मानांकन दिले जाते.

यानुसार आता आयसीसीने जुलै २०२४ मधील सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठी भारताच्या वॉशिंग्टन सुंदरसह इंग्लंडच्या गस ऍटकिन्सन आणि स्कॉटलंडच्या चार्ली कॅसल यांना नामांकन दिलं आहे. तसेच सर्वोत्तम महिला खेळाडूसाठी भारताच्या शफाली वर्मा आणि स्मृती मानधनासह श्रीलंकेच्या चमारी अट्टापट्टू हिला नामांकन देण्यात आले आहे.

या सहाही खेळाडूंची कामगिरी जुलै महिन्यात उल्लेखनीय राहिली होती.

Team India
IND vs SL, ODI: श्रेयस अय्यरचा डायरेक्ट हिट अन् श्रीलंकेच्या मेंडिसबरोबर झाला 'गुलीगत धोका', पाहा Video

सुंदरने जुलै महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यात ५ टी२० सामन्यांची मालिका आणि श्रीलंका दौऱ्यात ३ टी२० सामन्यांची मालिका खेळली. त्याने ८ पैकी ६ टी२० सामने खेळताना १० विकेट्स घेतल्या. तसेच त्याने खालच्या फळीत फलंदाजी करतानाही मोलाचे योगदान दिले. तो झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील मालिकावीरही ठरला होता.

तसेच इंग्लंडच्या गस ऍटकिन्सनने जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन कसोटी सामने खेळताना २२ विकेट्स घेतल्या, तर स्कॉटलंडच्या चार्लीने जुलै महिन्यात पदार्पण करताना पहिल्याच वनडे सामन्यात ओमान विरुद्ध २१ धावांत ७ विकेट्स घेतल्या.

Team India
IND vs SL: विराटच्या DRS वरून राडा! नॉटआऊट दिल्यानंतर श्रीलंकेच्या यष्टीरक्षकानं हेल्मेटच खाली फेकलं, पाहा Video

दरम्यान महिलांच्या क्रिकेटबद्दल सांगायचे झाले, तर मानधनाने जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका आणि आशिया कप खेळला. यादरम्यान तिने ३ अर्धशतकांसह २७३ धावा केल्या. तसेच तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटीत १४९ धावांची खेळी केली.

शफलीनेही या मालिका खेळल्या असून तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत २२९ धावांची खेळी केली, तर टी२० मध्ये २४५ धावा केल्या. चमारी अट्टापट्टूचीही कामगिरी शानदार राहिली. तिच्या नेतृत्वात श्रीलंकने आशिया कप जिंकला. तिने या स्पर्धेत ५ डावात ३०४ धावा केल्या. ती या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरली.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.