T20 World Cup Anthem: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अँथमची घोषणा केली आहे. या स्पर्धेला 50 दिवसांचा कालावधी राहिला असल्याने आयसीसीने या अँथमचा टीझर शुक्रवारी (12 एप्रिल) लाँच केला.
2 जूनपासून कॅरेबियन बेटं (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत सुरू होणाऱ्या या टी20 वर्ल्डकपच्या अँथमचे निर्माचा मायकल 'टॅनो' मोटँनो आहे. या अँथममध्ये अनेक सुपरस्टार असणार आहे, अशी माहिती आयसीसीने दिली आहे.
दरम्यान, या अँथममध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेता सीन पॉलही दिसणार असून त्याच्यासह केस डायफेन्थॉलरही गाणार आहे. डायफेन्थॉलर जगभरात केस म्हणून ओळखला जातो, तो त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील केस द बँडचा प्रमुख गायक आहे.
या अँथममध्ये कॅरेबियन ताल आणि आंतरराष्ट्रीय ढंग असे मिश्रण पाहायला मिळणार आहे.
या अँथमबद्दल बोलताना जमैकाचा सीन पॉल म्हणाला, 'क्रिकेट नेहमीच आमच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग राहिला आहे आणि टी20 वर्ल्डकपचे अँथम रेकॉर्ड करण्याची संधी मिळणे अभिमानाची बाब आहे.'
याशिवाय केस म्हणाला, 'संपूर्ण जगाला एकत्र आणणे हा आमचा हेतू आहे. त्यामुळे क्रिकेटला संगीताशी जोडल्याने एक शक्तीशाली मिश्रण तयार होईल. हे अँथम निर्माण करण्यात सीन पॉल, टॅनो आणि संपूर्ण टीमचे योगदान राहिले आहे. हे गाणे संपूर्ण जगाने गाण्याची उत्सुकता आहे.'
दरम्यान, 2 ते 29 जून दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या सहभागी संघांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संघ घोषित करावे लागणार आहेत. तसेच 25 मे पर्यंत संघात बदल करण्याची परवानगी असेल.
या स्पर्धेतील साखळी फेरीसाठी भारताचा समावेश ए ग्रुपमध्ये करण्यात आला असून या ग्रुपमध्ये आयर्लंड, कॅनडा, अमेरिका आणि पाकिस्तान संघांचा समावेश आहे.
भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होईल, तर दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. तिसरा सामना 12 जूनला अमेरिकेविरुद्ध आणि 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता चालू होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.