Hall Of Fame: ICC कडून मोठी घोषणा! डिविलियर्स, कूकसह एका भारतीय खेळाडूचाही होणार सन्मान

Three legends inducted in ICC Hall of Fame: आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये तीन दिग्गजांना सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एका भारतीय खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे.
Alastair Cook Ab de Villiers | ICC Hall of Fame
Alastair Cook Ab de Villiers | ICC Hall of FameSakal
Updated on

ICC Hall of Fame: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (१६ ऑक्टोबर) मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने यंदा हॉल ऑफ फेममध्ये तीन दिग्गजांना सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एका भारतीय खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ऍलिस्टर कूर, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिविलियर्स आणि भारताची दिग्गज महिला खेळाडू नितू डेव्हिड यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून सन्मान करण्यात आला आहे.

नितू डेव्हिड या आयसीसी हॉल ऑफ फेमध्ये सामील होणाऱ्या डायना एडुलजी यांच्यानंतरच्या दुसऱ्याच भारतीय महिला क्रिकेटपटू आहेत. तसेच एकूण १० व्या भारतीय खेळाडू आहेत.

त्यांच्यापूर्वी सुनील गावसकर, बिशन सिंग बेदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू मंकड, सचिन तेंडुलकर, डायना एडुलजी आणि विरेंद्र सेहवाग या भारतीय खेळाडूंना आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये जागा मिळाली आहे.

Alastair Cook Ab de Villiers | ICC Hall of Fame
PAK vs ENG: इंग्लंडविरूद्धचा कसोटी सामना गमावल्यानंतर पाकिस्तानने केली ICC Umpire ची निवड समितीमध्ये नियुक्ती

नितू डेव्हिड

नितू डेव्हिड यांनी १० कसोटी सामने खेळले असून १८.९० च्या सरासरीने ४१ विकेट्स घेतल्या आहेत, तसेच ९७ वनडेमध्ये १६.३४ च्या सरासरीने १४१ विकेट्स घेतल्या आहेत. त्या वनडेमध्ये १०० विकेट्स घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू होत्या.

त्या सध्यादेखील महिला वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या झुलन गोस्वामीनंतरच्या दुसऱ्या क्रमांकाच्या भारतीय गोलंदाज आहेत. सध्या भारतीय महिला निवड समितीच्या अध्यक्षा देखील आहेत.

त्यांनी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये जागा मिळण्याबद्दल आनंद व्यक्त केला असून हा मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी त्यांना करियरमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल आयसीसी, बीसीसीआय, संघसहकारी, प्रशिक्षक, कुटुंब आणि मित्रपरिवाराचे आभार मानले आहेत.

Alastair Cook Ab de Villiers | ICC Hall of Fame
भारताचे दिग्गज टेनिसपटू पेस अन् अमृतराज यांनी रचला इतिहास! Hall of Fame मध्ये सामील होणारे पहिलेच आशियाई

कूक अन् डेविलियर्सचाही सन्मान

इंग्लंडचा माजी कर्णधार कूकने १६१ कसोटी सामन्यांमध्ये ४५.३५ च्या सरासरीने १२,४७२ धावा केल्या आहेत. तसेच ९२ वनडेत ३६.४० च्या सरासरीने ३,२०४ धावा केल्या आहेत. तो ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून ६१ धावा केल्या आहेत.

तो सर्वाधिक सलग १५९ कसोटी सामने खेळला आहे. तो इंग्लंडचा सर्वाधिक कसोटी धावा करणारा जो रुटनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्यानेही हॉल ऑफ फेममधील समावेशाबाबत आनंद व्यक्त केला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सची कारकीर्दही बहारदार ठरली. त्याने ११४ कसोटी सामन्यांमध्ये ५०.६६ च्या सरासरीने ८,७६५ धावा केल्या आहेत. २२८ वनडे सामन्यांमध्ये त्याने ५३.५० च्या सरासरीने ९,५७७ धावा केल्या आहेत. त्याने ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये २६.१२ च्या सरासरीने १,६७२ धावा केल्या आहेत.

डिविलियर्स नेहमीच त्याच्या चौफेर फलंदाजीसाठी ओळखला गेला आहे. त्याने १४ वर्षे क्रिकेट खेळताना बरीच वर्षे यष्टीरक्षणही केले. त्याच्या नावावर वनडेमध्ये सर्वात कमी डावात शतक करण्याचाही विश्वविक्रम आहे. त्याने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.