T20 World Cup 2024: विजेत्या अन् उपविजेत्यांबरोबरच सर्वच 10 संघांवर होणार पैशांची बरसात, ICC कडून बक्षीस रक्कमेची घोषणा

Women’s T20 World Cup 2024 Prize Money: आयसीसीने आगामी महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे.
India Women Team
India Women TeamX/BCCIWomen
Updated on

Women’s T20 World Cup 2024 Prize Money: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने आगामी महिला टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

महिला टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी आयसीसीने 7,958,080 अमेरिकन डॉलर (साधारण 66 कोटी रुपये) इतकी एकूण बक्षीस रक्कम या स्पर्धेसाठी ठेवली आहे, विशेष म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा ही दुप्पट बक्षीस रक्कम आहे.

विजेत्या संघाला 2.34 मिलियन डॉलर (साधारण 19 कोटी रुपये) बक्षीस दिले जाणार आहे, तर उपविजेत्याला 1.17 मिलियन डॉलर (साधारण 10 कोटी रुपये) बक्षीस मिळणार आहे.

India Women Team
T20 World Cup 2026 साठी अशी असेल टीम इंडिया; सूर्यकुमार कॅप्टन, ऋतुराजला संधी; संजू सॅमसन दुर्लक्षित
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.