USA मधील नव्या क्रिकेट स्पर्धेला ICC कडून मान्यता; वसीम अक्रम, विवियन रिचर्ड्स असणार मेंटॉर

US National Cricket League: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील यूएसएच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर यूएसएमध्ये क्रिकेटचा विकास झपाट्याने होत आहे. अशातच यूएसए राष्ट्रीय क्रिकेट लीग द्वारे 'सिक्सटी स्ट्राइक्स' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
icc
iccesakal
Updated on

Sixty Strikes tournament: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर यूएसएमध्ये क्रिकेटला चालना मिळत आहे. या स्पर्धेमध्ये यूएसए संघाने देखील उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे बेसबॉलप्रिय अमेरिकेत क्रिकेटबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

यूएसएमध्ये क्रिकेट विकसित होण्यास सुरूवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर यूएसए राष्ट्रीय क्रिकेट लीग द्वारे 'सिक्सटी स्ट्राइक्स' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) मान्यता मिळाली आहे.

icc
Rohit Sharma: काय थांबा? रोहितचं पॅपराजींना मराठीत उत्तर, हिटमॅन म्हणताच चेहऱ्यावरही खुललं हास्य; Video Viral

या स्पर्धेसाठी यूएसए राष्ट्रीय क्रिकेट लीगने दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा उद्योगपती हारून लोर्गट यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे व दुबई-आधारित एसइइ(SEE)कंपनीकडून या स्पर्धेला सहकार्य मिळाले आहे. क्रिकेटमध्ये DRS प्रणाली विकसित करण्यात दक्षिण आफ्रिकेचे उद्योगपती आणि क्रिकेट प्रशासक हारून लोर्गट यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

४ ते १४ ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा होणार असून प्रत्येक सामन्यासाठी सुमारे ४००० प्रेक्षक उपस्थित राहतील अपेक्षा दर्शवली जात आहे. दिग्गज खेळाडू वसीम अक्रम, सर विवियन रिचर्ड्स आणि सनथ जयसूर्या यांसारखे क्रिकेट दिग्गज 'सिक्स्टी स्ट्राइक्स' स्पर्धेत संघांचे मार्गदर्शन करतील.

icc
Women's T20 World Cup: भारतीय खेळाडूंना पहिल्या सामन्यापूर्वी कुटुंबियांकडून खास भेट, BCCI ने शेअर केला Video

स्पर्धेबाबत बोलताना हारून लोर्गट म्हणाले, "अशा परिवर्तनाच्या क्षणी विषेश भूमिका साकारण्याचा मला आनंद आहे. क्रिकेट खेळामध्ये नवीन खेळाडूंना प्रेरणा देण्याची आणि यूएसए मधील चाहत्यांना एकत्र आणण्याची क्षमता आहे. आम्ही यूएसएमध्ये नवीन काहीतरी आणत आहोत. आम्ही अमेरिकेच्या खेळातील भविष्याचा पाया घालण्याचा प्रयत्न करत आहोत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()