ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताच्या युवा खेळाडूंची ताकद दिसून आली आहे. रांची कसोटीत विजयाचा हिरो ठरलेला सामनावीर ध्रुव जुरेलने या क्रमवारीत गगणभरारी घेतली आहे.
तर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनाही ताज्या कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने रांचीमध्ये 55 धावांची इनिंग खेळली होती. पण तरीही त्याला एक स्थान गमवावे लागले आहे. तर ही मालिका खेळत नसल्याने विराट कोहलीला आपले स्थान गमवावी लागली आहेत.
ध्रुव जुरेलने घेतली 31 स्थानांची झेप
भारताकडून केवळ दोन कसोटी सामने खेळून प्रसिद्धीझोतात आलेल्या ध्रुव जुरेलने 31 स्थानांची झेप घेतली आहे. रांची कसोटीनंतर तो 100व्या स्थानावर होता, आत तो 69व्या स्थानावर पोहोचला. शुभमन गिल आता चार स्थानांच्या प्रगतीसह 31व्या स्थानावर पोहोचला आहे. यशस्वी 12 व्या स्थानावर आहे तर रोहित शर्मा एका स्थानाच्या नुकसानासह 13 व्या स्थानावर आला आहे.
अव्वल 10 मध्ये विराट एकमेव भारतीय!
सध्या कसोटी क्रिकेट जास्त खेळले जात आहे. त्यामुळे क्रमवारीत जास्त बदल होताना दिसत आहेत. ताज्या क्रमवारीत केन विल्यमसनही अव्वल स्थानावर आहे. तसेच, 31वे कसोटी शतक झळकावणारा जो रूट तिसऱ्या स्थानावर आला आहे. अव्वल 10 मध्ये विराट कोहली एकमेव भारतीय आहे, जो दोन स्थानांच्या नुकसानासह 9व्या स्थानावर आहे.
गोलंदाज आणि अष्टपैलूंची क्रमवारी
गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल, रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. रवींद्र जडेजा सहाव्या स्थानावर आहे.
जर आपण अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीबद्दल बोललो, तर रवींद्र जडेजा अव्वल आणि रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.