ICC Rankings : यशस्वी जैस्वालने रचला इतिहास! पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत केली 'ही' मोठी कामगिरी

टीम इंडियाचा युवा ओपनिंग बॅट्समन यशस्वी जैस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
ICC Rankings Yashasvi Jaiswal Marathi News
ICC Rankings Yashasvi Jaiswal Marathi Newssakal
Updated on

Yashasvi Jaiswal ICC Test Rankings : टीम इंडियाचा युवा ओपनिंग बॅट्समन यशस्वी जैस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जवळपास प्रत्येक डावात त्याच्या बॅट तुफान चालत आहे. यामुळे त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे.

दरम्यान, जैस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत आपले सर्वकालीन उच्च स्थान गाठले आहे. त्याने आधीच आपला कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले होते. आता त्याला आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्यांदाच मोठे यश मिळाले आहे.

ICC Rankings Yashasvi Jaiswal Marathi News
MS Dhoni : IPL 2024 पूर्वी धोनी दिसला नव्या भूमिकेत, व्हिडिओ शेअर करून खुलासा

इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील शेवटचा सामना सात मार्चपासून धरमशाला येथे होणार आहे. यामध्येही अनेक मोठे विक्रम आणि विक्रम त्याच्या लक्ष्यावर असणार आहेत. दरम्यान, सामन्याच्या एक दिवस आधी आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत यशस्वी जैस्वालने पहिल्यांदाच पहिल्या दहामध्ये एंट्री मारली आहे. तो सध्या दहाव्या क्रमांकावर आहे.

ICC Rankings Yashasvi Jaiswal Marathi News
Ind vs Eng : पाचव्या कसोटीसाठी संघाची घोषणा! खेळपट्टीचा रंग पाहून केला मोठा बदल

याआधी, आयसीसीने गेल्या आठवड्यात रँकिंग जाहीर केली. तेव्हा त्याचे रेटिंग 727 होते आणि तो बाराव्या क्रमांकावर होता. दरम्यान, तो एकही कसोटी खेळला नाही, त्यामुळे त्याच्या गुणावर कोणताही परिणाम झालेला नाही. पण इतर फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फायदा त्याला झाला. आणि तो थेट दहाव्या क्रमांकावर आला. हे देखील जैस्वालचे सर्वकालीन उच्च रँकिंग आहे. गेल्या आठवड्यातच त्याने रोहित शर्माला मागे टाकले होते.

ICC Rankings Yashasvi Jaiswal Marathi News
Ind vs Eng R Ashwin : “मी इतके फोन केले पण...” 100 व्या कसोटीआधी माजी खेळाडूने अश्विनवर केले गंभीर आरोप

यशस्वी जैस्वालला दोन स्थानांचा फायदा झाला आहे, तर रोहित शर्मानेही 13व्या स्थानावरून 11व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग आता 720 आहे. दरम्यान, रोहित आणि जैस्वाल यांनी गेल्या आठवड्यापासून एकही कसोटी खेळलेली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीचा त्यांना फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आता एका स्थानाने घसरून 12व्या स्थानावर आला आहे. त्याचे रेटिंग 718 आहे, तर मार्नस लॅबुशेनने 5 स्थान गमावले आहेत. तो सध्या 707 च्या रेटिंगसह 13 व्या क्रमांकावर आहे. याचा फायदा रोहित आणि यशस्वी यांना मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()