International Cricket Council key recommendations - आयसीसीच्या क्रिकेट समितीने वन डे सामन्यांच्या पहिल्या २५ षटकांसाठी २ नवीन चेंडू वापरण्याची सूचना केली आहे. कसोटी आणि वन डे फॉर्मेटला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC ) ने प्रमुख शिफारसी आणल्या आहेत. ज्यामध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी असाही प्रस्ताव आहे. त्याशिवाय यजमान देशांनी WTC च्या पुढील हंगामात घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत अधिक दिवस-रात्र कसोटी सामने खेळवण्याचा प्रयत्न करावा, अशाही सुचना केल्या गेल्या आहेत.