ICC T20I Ranking: सूर्यकुमारचं सिंहासन ऑस्ट्रेलियाच्या हेडने हिसकावलं; पण हार्दिक, बुमराह अन् कुलदीपची मोठी झेप

Suryakumar Yadav T20 Ranking: आयसीसीने बुधवारी ताजी टी20 क्रमवारी जाहीर केली असून सूर्यकुमार यादव अव्वल क्रमांकावरून खाली घसरला आहे. मात्र, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना मोठा फायदा झाला आहे.
Suryakumar Yadav | Travis Head
Suryakumar Yadav | Travis HeadSakal
Updated on

ICC T20I Ranking: आयसीसीने बुधवारी ताजी टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या ताज्या क्रमवारीनुसार आता फलंदाजांच्या यादीत मोठे बदल झाले असून भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला आपला अव्वल क्रमांक गमवावा लागला आहे. मात्र हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी मोठी झेप घेतली आहे.

टी20 वर्ल्ड कप 2024 मधील सुपर-8 फेरीनंतर आयसीसीने ही क्रमवारी जाहीर केली आहे. या टी20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमारच्या कामगिरीत फारसे सातत्य दिसले नाही.

त्याला गेल्या काही काळातील कामगिरीत सातत्य नसल्याचा फटका बसला असून आता त्याला टी20 फलंदाजी क्रमवारीतील ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेविस हेडने मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे आता हेड अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे.

सूर्यकुमार डिसेंबर 2023 पासून टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता. पण अखेर टी२० वर्ल्ड कपमधील शानदार कामगिरीमुळे हेडने त्याच्याकडून हे स्थान मिळवले आहे.

Suryakumar Yadav | Travis Head
T20 World Cup 2024: '...माझ्या डोळ्यात पाणी आलं', गुलबदिन नैबच्या क्रॅम्पवर काय म्हणाला ऑस्ट्रेलियन कर्णधार?

हेडने यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये 7 सामन्यांत 255 धावा केल्या असून तो यंदा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने भारताविरूद्धच्या सामन्यात 76 धावांची खेळीही केली होती. हेडने या क्रमवारीत 4 स्थानांची उडी घत सूर्यकुमारसह फिल सॉल्ट, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनाही मागे टाकले आहे.

सध्या हेड पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार, तिसऱ्या क्रमांकावर फिल सॉल्ट, चौथ्या क्रमांकावर बाबर आझम आणि पाचव्या क्रमांकावर मोहम्मद रिझवान आहे.

याशिवाय या क्रमवारीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये जॉन्सन चार्ल्सनेही स्थान मिळवले आहे. तो आता चार स्थानांनी पुढे येत 10 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या अफगाणिस्तानच्या रेहमनुल्लाह गुरबाजनेही 5 स्थानांची प्रगती करत 11 व्या क्रमांकावर आला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही बदल

दरम्यान, अष्टपैलू खेळाडूंच्या टी20 क्रमवारीतही बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिस पहिल्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. त्यामुळे आता अव्वल क्रमांकावर श्रीलंकेचा कर्णधार वनिंदू हसरंगा आला असून दुसऱ्या क्रमांकावरअफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आहे.

त्याचबरोबर हार्दिक पांड्यानेही या क्रमवारीत मोठी झेप घेतली असून तो आता चार क्रमांकांनी पुढे येत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. या क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये हार्दिक एकमेव भारतीय आहे.

Suryakumar Yadav | Travis Head
David Warner: वॉर्नरने निवृत्ती घेताच रिकी पाँटिंगचा ऑस्ट्रेलियाला इशारा, म्हणाला, 'आता अवघड आहे की...'

गोलंदाजांमध्ये राशिद अव्वल क्रमांकावर कायम

टी20 गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा आदिल राशिद अव्वल क्रमांकावर कायम असून दुसऱ्या क्रमांकावर राशिद खान आहे. गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूडने 3 स्थांनांची प्रगती केली असून आता तो चौथ्या क्रमांकावर आहे.

या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर वनिंदू हसरंगा आहे. गोलंदाजांमध्ये पहिल्या 10 जणांमध्ये भारताचा अक्षर पटेल आहे. तो 8 व्या क्रमांकावर आला आहे.

इतकेच नाही, तर फिरकीपटू कुलदीप यादवने तब्बल 20 स्थांनांची उडी घेत 11 वा क्रमांक मिळवला आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ४४ स्थानांनी पुढे येत 24 व्या स्थानी विराजमान झाला आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा जोफ्रा आर्चर 38 व्या क्रमांकावर आला आहे.

Chitra kode:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()