ICC Test Ranking : टाइगर का हुकुम... पुन्हा एकदा अश्विन बनला 'नंबर १'; रोहित अन् जैस्वालचीही 'यशस्वी' झेप

ICC Test Rankings 2024 Latest News : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या क्रमवारीत पुन्हा एकदा रविचंद्रन अश्विनचा डंका पाहिला मिळत आहे.
ICC Test Rankings 2024 Latest Marathi News
ICC Test Rankings 2024 Latest Marathi News ेकोत
Updated on

ICC Test Rankings 2024 Latest News : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या क्रमवारीत पुन्हा एकदा रविचंद्रन अश्विनचा डंका पाहिला मिळत आहे. त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकले आणि जगातील नंबर वन गोलंदाज बनला. त्याचवेळी जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारताच्या कुलदीप यादवनेही लांब उडी मारली आहे. याशिवाय फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनाही फायदा झाला आहे.

ICC Test Rankings 2024 Latest Marathi News
IPL 2024 : कोण असणार माहीचा उत्तराधिकारी? CSK नवीन कर्णधार निवडण्याच्या तयारीत, धोनी घेणार मोठा निर्णय

37 वर्षीय भारतीय अनुभवी फिरकीपटूने धरमशाला येथे टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. अश्विनने दोन्ही डावांसह 128 धावांत नऊ बळी घेतले होते. अश्विनने बुमराहला पहिल्या स्थानावरून मागे टाकले आहे. याआधी बुमराहही अश्विनच्या जागी नंबर वन कसोटी गोलंदाज बनला होता. अश्विनचे ​​870 रेटिंग गुण आहेत.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड 847 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे. कागिसो रबाडा चौथ्या आणि पॅट कमिन्स पाचव्या स्थानावर आहे. अव्वल १० गोलंदाजांमध्ये भारताचा रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव टॉप 20 मध्ये आला आहे. त्याने 15 स्थानांची झेप घेत 16व्या स्थानावर पोहोचला आहे. टॉप-20 गोलंदाजांमध्ये भारताचे चार गोलंदाज आहेत.

ICC Test Rankings 2024 Latest Marathi News
Ranji Trophy Final : मुंबई-विदर्भातील सामना ड्रॉ झाला तर कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या काय सांगतो नियम

त्याचबरोबर धरमशालामध्ये शतके झळकावणाऱ्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनीही कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत वर आले आहे. रोहितने पाच स्थानांची झेप घेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी यशस्वी जैस्वालनेही दोन स्थानांची सुधारणा करत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

विराट कोहलीला एका स्थानाचा फटका बसला असून तो नवव्या स्थानावर घसरला आहे. टीम इंडियाच्या सेटअपमधून बराच काळ बाहेर असलेला ऋषभ पंतही एक स्थान गमावून 15व्या स्थानावर घसरला आहे. धरमशाला कसोटीत शानदार शतक झळकावणाऱ्या शुभमनने 11 स्थानांची झेप घेतली असून तो 21व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ICC Test Rankings 2024 Latest Marathi News
IPL 2024 : "पैसे कमवणे ठीक पण.." आयपीएलवरून हार्दिक पांड्याला माजी क्रिकेटरने धुतले

फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर आहे. तर, इंग्लंडचा जो रूट दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या तर न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पाचव्या स्थानावर आहे.

कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम आहे. तर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या तर इंग्लंडचा रूट चौथ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा जेसन होल्ड पाचव्या स्थानावर आहे. त्याचवेळी अक्षर पटेलची एका स्थानावर घसरण झाली आणि तो सहाव्या स्थानावर घसरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.