ICC Test Ranking: बांगलादेशने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात १० विकेट्सने पराभूत केले, तर इंग्लंडने श्रीलंकेला ५ विकेट्सने मात दिली. या दोन कसोटी सामन्यांनंतर आता बुधवारी (२८ ऑगस्ट) आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
या क्रमवारीत इंग्लंडच्या हॅरी ब्रुक आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मोठा फायदा झाला आहे.
तसेच इंग्लंडच्या जो रुटने आपला फलंदाजांच्या यादीतील अव्वल क्रमांक मात्र कायम ठेवला आहे. पण असं असलं तरी भारतीय खेळाडूंचे पहिल्या १० जणांच्या खेळाडूंमध्ये वर्चस्व दिसून येत आहे. पहिल्या १० जणांमध्ये भारताचे विराट कोहली, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल आहे.