T20 World Cup बांगलादेशमध्ये नाही, 'या' ठिकाणी होणार स्पर्धा; ICC च्या बैठकीत निर्णय

ICC Women's T20 World Cup 2024 Venue Change Update: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा बांगलागदेशमधून हलवला जाणार आहे. याबाबत आयसीसीची मंगळवारी बैठक पार पडली.
Women's T20 World Cup 2024
Women's T20 World Cup 2024Sakal
Updated on

ICC Women's T20 World Cup 2024: बांग्लादेशमध्ये गेल्या काही दिवसात अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळाले होते. शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर तिने सध्या नवे सरकार स्थापन झाले आहे. पण असं असलं तरी तिथं अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. तिथे काही दिवसांपूर्वी हिंसाचारही झाल्याचे दिसले होते.

या सर्व प्रकरणानंतर आगामी महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजक बांगलादेश क्रिकेट बोर्ड आहे. मात्र गेल्या काही दिवसातील स्थिती पाहता आता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. याबाबत आयसीसीने पुष्टी केली आहे.

Women's T20 World Cup 2024
T20 World Cup 2025 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एका गटात नाही

मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) बैठक ऑनलाईन पार पडली. जे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते, त्यांच्यामते सध्याच्या अस्थिर परिस्थितीत स्पर्धा होऊ शकत नाही.

तसेच बांगलादेश क्रिकेट बोर्डही ही स्पर्धा हलवण्यास तयार आहे. तथापि, जरी ही स्पर्धा हलवली, तरी आयोजक म्हणून हक्क बांगलादेशकडे कायम राहतील.

या स्पर्धसाठी २६ ऑगस्टपासूनच सराव सामने होणार आहेत. तसेच या स्पर्धेतील सामने दुबई आणि शारजाह या दोन शहरात होतील. या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत.

Women's T20 World Cup 2024
बांगलादेशमध्ये सध्या T20 World Cup नकोच! ऑस्ट्रेलियाची कर्णधार असं का म्हणाली?

दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताचाही पर्याय म्हणून विचार केला होता, मात्र बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट नकार कळवला आहे.

भारतात पावसाळा सुरू आहे आणि पुढील वर्षी भारतात महिलांची वनडे वर्ल्ड कप स्पर्धा नियोजित आहे. त्यामुळे पाठोपाठ दोन वर्ल्ड कप स्पर्धा भारतात खेळवणे योग्य ठरणार नाही, असे जय शहा यांनी कळवले आहे.

ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार एलिसा हेली हिने देखील बांगलादेशमध्ये सध्या टी२० वर्ल्ड कप खेळवणे चुकीचे वाटत असल्याचे म्हटले होते.

तणावाखालून जात असलेल्या बांगलादेशमध्ये खेळणे मला कठीण जाईल, एक माणूस म्हणून तेथे खेळणे योग्य ठरणार नाही. नागरिकांचे जीव जात असताना आपण खेळत राहणे मनाला पटत नाही. सर्वप्रथम त्यांच्या देशाची गाडी रुळावर येणे महत्त्वाचे आहे, असे मत हिलीने व्यक्त केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.