'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Border-Gavaskar Trophy - भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेला नाही.
rohit Sharma
rohit Sharmaesakal
Updated on

India vs Australia Rohit Sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला पुत्रप्राप्ती झाली आहे. त्याची पत्नी रितिकाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे आणि आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होईल अशी अपेक्षा आहे. पण, टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे की पत्नी व बाळासोबत वेळ घालवायचा, यापैकी अवघड निर्णय रोहितला घ्यायचा आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ( ३-०) लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे आणि त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. अशा परिस्थितीत रोहितची टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात खरी गरज आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याने मांडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.