Virat Kohli UK Citizen: विराटने ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारल्यास, तो IPL मध्ये परदेशी खेळाडू म्हणून खेळणार का?

Virat Kohli UK citizen: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय.. कालच तो तेथील रेल्वेत प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. विराट लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या चर्चा आहेत.
Virat kohli USA
Virat kohli USAesakal
Updated on

What if Virat Kohli becomes UK citizen? विराट कोहली इंडियन प्रीमिअर लीगच्या आगामी पर्वांत कदाचित परदेशी खेळाडू म्हणून खेळताना दिसला तर... IPL मध्ये विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून बरीच वर्ष खेळतोय. पण, तो कदाचित ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारू शकतो, अशी अफवा पसरली आहे. विराट भविष्यात लंडनमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जातेय... जर तो लंडनमध्ये स्थायिक झाला, तर मग तो आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू म्हणून खेळू शकतो का, हा प्रश्न पडतोय.. असे घडल्यास नेमकं काय होऊ शकतं, हे जाणून घेऊयात...

काही मीडियाच्या वृत्तानुसार विराट त्याच्या कुटुंबियांसह आधीच लंडनमध्ये शिफ्ट झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत नसताना तो बऱ्याचदा इंग्लंडमध्ये त्याचा वेळ घालवतो. त्याने ब्रिटनच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला नसला तरी त्याला भविष्यात भारत व ब्रिटन असे दोन्ही देशांचे नागरिकत्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Virat kohli USA
आता माझी सटकली! Carlos Brathwaite बॅटने हेल्मेट भिरकावले, डग आऊटमध्ये राडा, Video Viral

विराट कायमचा लंडनला स्थायिक झाला तर?

निवृत्तीनंतर भारताबाहेर जाण्याचे संकेत विराटने दिले होते आणि निवृत्तीनंतर तुम्ही मला पाहू शकणार नाही, असेही तो म्हणाला होता. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, एकदा का मी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर मी निघून जाणार. तुम्हाला मी काही काळ भेटणार नाही.

विराट व अनुष्का शर्मा यांचे दुसऱ्या बाळाचा जन्म ( अकाय) लंडनमध्ये झाला आणि ते बराच काळ तिथेच राहतात.

Virat Kohli | IPL
Virat Kohli | IPLeSakal

मग तो आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू म्हणून खेळेल?

जर त्याने ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारल्यास तो आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू म्हणूनच खेळण्याची शक्यता अधिक आहे. ब्रिटीश नागरिकांना दुहेरी नागरिकत्वाची परवानगी असली तरी, भारतात तशी परवानगी ​​नाही. त्यामुळे कोहलीने ब्रिटन नागरिकत्व स्वीकारल्यास त्याला भारतीय पासपोर्ट सरेंडर करावे लागेल. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू म्हणून खेळावे लागेल.

Virat kohli USA
PAK vs BAN: पाकिस्तान क्रिकेट संघाची नाचक्की; लाजीरवाण्या पराभवानंतर ICC न केली मोठी कारवाई

तसे झाल्यास काय?

विराटने ब्रिटन नागरिकत्व स्वीकारल्यास त्याला संघात कायम राखण्यासाठी RCB ला एका परदेशी खेळाडूला रिलीज करावे लागेल. पण, पुढील ३-४ वर्ष विराट भारताबाहेर जाण्याची शक्यता कमीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.