Video : ड्रेसिंग रूममध्ये पाकिस्तानी खेळाडूने केले लज्जास्पद कृत्य! व्हिडिओ होतोय व्हायरल

PSL 2024 Final Video : पाकिस्तान सुपर लीग 2024 हंगामाचा अंतिम सामना 18 मार्च रोजी कराचीच्या मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाने विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
Imad Wasim Spotted Smoking In Dressing Room Marathi News
Imad Wasim Spotted Smoking In Dressing Room Marathi Newssakal
Updated on

Imad Wasim Spotted Smoking In Dressing Room : पाकिस्तान सुपर लीग 2024 हंगामाचा अंतिम सामना 18 मार्च रोजी कराचीच्या मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाने विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

या सामन्यात इमाद वसीमची चमकदार अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. पण त्याच्या एका कृतीमुळे संपूर्ण स्पर्धेसाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली. अंतिम सामन्यादरम्यान इमादचा ड्रेसिंग रूमचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्मोकिंग करताना दिसत आहे. त्याच्या या कृतीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप पाहायला मिळत आहे.

Imad Wasim Spotted Smoking In Dressing Room Marathi News
IPL 2024 : अंतर राखूनच....! मुंबईच्या व्हिडिओमध्ये रोहित अन् हार्दिकमधील 'ती' जागा सांगून गेली सर्व काही

अंतिम सामन्यादरम्यान मुलतान सुलतान्स संघाने 17 षटकांत 127 धावा होईपर्यंत 9 विकेट गमावल्या होत्या, तेव्हा इमाद ड्रेसिंग रूममध्ये बसला होता. दरम्यान, कॅमेरा त्याच्या दिशेने गेला तेव्हा तो धूम्रपान करताना स्पष्ट दिसत होता.

या सामन्यातील इमादच्या कामगिरीबद्दल बोललो तर, त्याने पहिल्या गोलंदाजीत त्याच्या 4 षटकात केवळ 23 धावा देत 5 विकेट घेतल्या, जी त्याच्या पीएसएल कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना इमादने 17 चेंडूत 19 धावांची नाबाद खेळी करत अखेरच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी इमादला सामनावीराचा किताबही देण्यात आला.

Imad Wasim Spotted Smoking In Dressing Room Marathi News
IPL 2024 : ट्रेनिंग सेशनमध्ये किंग कोहलीचा दिसला नवा अवतार, फलंदाजी सोडून करत होता 'हे' काम, Video Viral

इमाद वसीमने नोव्हेंबर 2023 मध्ये अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. इमाद बराच काळ पाकिस्तान संघाचा भाग नव्हता. त्याने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी 55 एकदिवसीय आणि 66 टी-20 सामने खेळले आहेत.

या कालावधीत, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 42.87 च्या सरासरीने 986 धावा केल्या आहेत आणि 44 बळीही घेतले आहेत. याशिवाय टी-20 मध्ये इमादने 486 धावा केल्या आणि 65 विकेट्स घेतल्या आहेत. इमादच्या नावावर एकदिवसीय आणि टी-20 मध्ये एक अर्धशतकी खेळी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.