IND vs AFG ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup : अफगाणिस्तानच्या अ संघाने इमर्जिंग आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत भारतीय गोलंदाजांचा पार कचरा केला. जुबैद अकबारी, सेदीकुल्ला अटल आणि करिम जनत यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. अंशूल कंबोज व अकिब खान या भारताच्या प्रमुख गोलंदाजावर त्यांची हल्लाबोल चढवला आणि दोनशेपार धावा उभ्या केल्या.
अफगाणिस्तानविरूद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दैना उडालेली पाहून चाहते टेंशनमध्ये आले. अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी तुफान फलंदाजी करत १३७ धावांची भागीदारी केली. आक्रमक रणनीतीने फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तनने ४ विकेट गमावून भारताला विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य दिले. सलामीवीर सेदीकुल्लाहने चौथ्या षटकातील पहिल्या २ चेंडूवर षटकार व चौकार लगावला. झुबाईद अकबरीने सहाव्या षटकाची सुरूवात षकारने केली. शेवटच्या ३ चेंडूवर सलग तीन चौकार लगावले. अकीब खानचे सहावे षटक भारताला महागात पडले, या षटकात तब्बल २४ धावा आल्या.
१२ व्या षटकातील ५व्या चेंडूवर चौकार मारत सेदीकुल्लाह ने स्वत:चे अर्धशतक व संघाचे शतक पुर्ण केले. दोघांचीही अर्धशतके पुर्ण होताच अफगाणिस्तानच्या खेळीचा वेग आणखी वाढला. १३व्या षटकात राहूल चहरची चांगलीच धुलाई झाली. राहूलले या षटकात सलग दोन नो चेंडू टाकले व अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी ४ षटकारांसह षटकात ३१ धावा जोडल्या.
भारताला पहिला विकेट मिळवण्यासाठी १४व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. आकिब खानच्या गोलंदाजीवर झुबाईद अकबरी ४१ चेंडूत ६४ धावा करून बाद झाला. सेदीकुल्लाह अटल व झुबाईद अकबरीने पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची मोठी भागीदारी केली. झुबाईद नंतर फलंदाजीसाठी आलेल्या करीम जनतनेही आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली.
सेदीकुल्लाहने करीमला साथीला घेत पुन्हा ४४ धावांची भागीदीरी केली. पण, १८व्या षटकात सेदीकुल्लाह बाद झाला. सेदीकुल्लाहने ७ चौकार व ४ चौकाराच्या जोडीने ५२ चेंडूत ८३ धवांची स्पोटक खेळी केली. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारताने साखळी सामन्यातील तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. तर, अफगाणिस्तान संघ २ सामने जिंकून उपांत्य फेरीत आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.