IND A vs AUS A 1st Test: भाारत 'अ' विरूद्ध ऑस्ट्रेलिया 'अ' पाहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यात ८८ धावांची आघाडी घेतली. त्यांनतर भारताकडे दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या करून सामन्यात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. त्यानुसार भारताने प्रयत्नही केला. भारताने दुसऱ्या डावात ३१२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी २२५ धावांचे आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिवसाअंतीपर्यंत ३ विकेट्स गमावत १३९ धावा केल्या. आणखी एका दिवसाचा खेळ शिल्लक असून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ८६ धावांची आवश्यकता आहे.
कालच्या दिवशी भारताने सुंदर खेळ केला. साई सुदर्शन (९६) व देवदत्त पडिक्कल (८०) धावांसह भारताने दुसऱ्या दिवसाअंतीपर्यंत भारताने २ विकेट्स गमावत २०८ धावा केल्या होत्या. पण तिसऱ्या दिवशी भारताचा डाव घसरण्यास सुरूवात झाली. साई सुदर्शनचे शतक पुर्ण झाले, पण देवदत्त पडिक्कलचे शतक १२ धावांनी हुकले. टॉड मर्फीने सुदर्शनला १०३ धावांवर बाद केले आणि सुदर्शन व पडिक्कलची शतकी भागीदारी द्विशतकापासून अवघ्या ४ धावांनी वंचित राहिली. पुढे मर्फीने पडिक्कलाही ८८ धावांवर पायचीत केले.
त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या इशान किशनने धावसंख्येत भर टाकण्याचा प्रयत्न केला, पण तोही ३२ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाने भारताला ३१२ केले आणि दिवसाअंतीपर्यंत भारताने दिलेल्या २२५ धावांच्या लक्ष्यापैकी निम्मे लक्ष्य गाठले.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाची सुरूवात संयमी केले. दीड दिवसाचा वेळ असल्यामुळे सलामीवीर फलंदाजांनी मैदानावर स्थिरावण्यात वेळ घेतला. सॅम कॉन्स्टसने ३३ चेंडूत १६ धावा केल्या, तर मार्कस हॅरिसला ८२ चेंडूत ३६ धावा करता आल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कॅमरॉन बॅंक्रॉफ्टलाही १६ धावांवर समाधान मानावे लागले. कर्णधार नेथन मॅकस्विनी (४७) व बीऊ वेबस्टर (१९) धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलिया संघ विजयापासून अवघ्या ८६ धावा दूर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.