Ishan Kishan Comeback in IND vs AUS: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी भारत 'अ' व ऑस्ट्रेलिया 'अ' संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारत 'अ' संघ भारताच्या मुख्य संघाविरूद्ध एक सामना खेळेल. यावेळी भारत 'अ' संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. तर २०२३ च्या वन-डे वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय सामन्यापासून वंचित असलेल्या इशान किशनला संघात स्थान देण्यात आले आहे. दुलीप ट्रॉफी व रणजी ट्रॉफी मधील चांगल्या कामगिरीमुळे इशानला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
ईशान किशन खूप काळानंतर भारतासाठी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जात असल्यामुळे इशानचे कुटूंबीय भावूक झाले. इशान दौऱ्यासाठी निघताना त्याच्या आई व आज्जीने त्याचा मायेने मुका घेतला व शुभेच्छा दिल्या. इशानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत 'अ' विरुद्ध ऑस्ट्रेलिया 'अ' मालिकेची सुरुवात मॅके येथे ३१ ऑक्टोबरपासून होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होईल. त्यानंतर, दुसरा सामना ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येईल. त्यानंतर पर्थ येथे १५-१७ नोव्हेंबरदरम्यान भारत 'अ' संघाचा सामना भारताच्या मुख्य संघाविरूद्ध होईल.
भारत 'अ' विरूद्ध ऑस्ट्रेलिया 'अ' वेळापत्रक
३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर: पहिला सामना, (मॅके)
७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर: दुसरा सामना, (मेलबर्न)
१५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर : भारत 'अ' विरूद्ध भारत (पर्थ)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत 'अ' संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिकल, रिकी भुई, बाबा इंद्रजित, इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), मुकेश कुमार, खलिल अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुतार, तनुष कोटियन