IND A vs AUS A: मुकेश कुमारच्या ६ विकेट्स अन् ऑस्ट्रेलिया ऑलआऊट! भारताला आता पुनरागमनाची संधी

IND A vs AUS A 1st Test: भारताच्या १०७ धावांच्या पहिल्या डावाला ऑस्ट्रेलियाने १९५ धावांनी प्रत्युत्तर देत सामन्यात ८८ धावांची आघाडी घेतली.
mukesh kumar
mukesh kumaresakal
Updated on

IND A vs AUS A 1st Test: ऑस्ट्रेलिया 'अ' संघ घरच्या मैदानावर पहिल्या दिवसापासून उल्लेखनीय कामगिरी करत आहे. भारतीय फलंदाजांचा ऑस्ट्रेलियातील मॅके मैदानावर फार काळ निभाव लागू शकला नाही. गोलंदाज ब्रेंडन डगेटच्या सहा विकेट्सच्या सहाय्याने ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव १०७ धावांवर गुंडाळला. त्यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९५ धावांची खेळी केली व सामन्यात ८८ धावांची आघाडी घेतली. आघाडी जास्त मोठी नसल्याने भारताकडे सामन्यात पुनरागमन करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेंडन डगेटच्या गोलंदाजीला उत्तर देत भारताच्या मुकेश कुमारनेही ऑस्ट्रेलियाचे ६ विकेट्स घेतले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण, भारताचा डाव सुरू होताच घसरायला सुरूवात झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या खात्यात भोपळा पडला. तर सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन ७ धावांवर माघारी परतला. साई सुदर्शन (२१) व देवदत्त पडिकल (३६) धावांची खेळी केली. पण त्यानंतर भारताचा डाव पुन्हा घसरला. नवदीप सैनीने २३ धावांचे योगदान दिले आणि भारताचा डाव १०७ धावांवर आटपला.

mukesh kumar
IND A vs AUS A: ऋतुराज ऑन 'गोल्डन' डक, घरच्या मैदानावर Aussies चा दणका; भारताचा १०७ धावांवर खुर्दा

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात फार काही चांगली झाली नाही. सुरूवातीचे ३ फलंदाज अवघ्या २६ धावांवर बाद झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डाव सावरण्यास सुरूवात केली. मधल्या फळीने टिकून खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यापैकीही कोणालाही अर्धशतकीय खेळी करता आलेली नाही. बीऊ वेबस्टर आणि कुपर कॉनोलीच्या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची भागिदारी केली. पण मुकेश कुमारने ३३ धावांवर वेबस्टरला बाद केले आणि त्यांची भागीदारी मोडली.

यावेळी भारतीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला ऑस्ट्रेलियाचे ६ विकेट्स घेण्यात यश आले. त्याला प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स घेत साथ दिली, तर नितीश रेड्डीला १ विकेट्स मिळाला.

mukesh kumar
IND vs NZ: जसप्रीत बुमराहला मुंबई कसोटीतून का बाहेर केलं? BCCI ने सांगितलं खरं कारण

भारताच्या दुसऱ्या डावाला सुरूवात झाली असून हाती आलेल्या शेवटच्या वृत्तानुसार भारताने २ विकेट्स गमावत ८३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाड (५) व अभिमन्यू ईश्वरन (१२) धावांवर बाद झाले. तर, साई सुदर्शन (३५) व देवदत्त पडिकल (२७) धावांवर नाबाद आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.