IND A vs AUS A 1st Test: पहिल्या डावातील खेळ लवकर संपुष्टात आल्यामुळे भारत पहिल्या डावानंतर सामन्यात पिछाडीवर गेला होता. दुसऱ्या डावात साई सुदर्शन व देवदत्त पडिक्कलने दिवसाअखेरीपर्यंत १७८ धावांची भागीदारी केली व भारताची धावसंख्या २०० पार घेऊन गेले. दोघेही शतकाच्या जवळ आहेत, तर भारताने दोन विकेट्स गमावत दुसऱ्या दिवसाअंती २०८ धावा करून सामन्यात १२० धावांची आघाडी घेतली आहे.
भारताला पहिल्या डावात अवघ्या १०७ धावा करता आल्या. ज्यामध्ये भारताच्या अवघ्या ३ खेळाडूंना दोन अंकी धावसंख्या करता आली होती, पण कोणालाही अर्धशतकापर्यंत मजला मारता आली नाही. या डावात कर्णधार ऋतुराज गायकवाडसह भारताचे ३ खेळाडू शून्यावर बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या ब्रेंडन डगेटने डावात भारताचे ६ विकेट्स घेतले.
ऑस्ट्रेलियाचा डावही लवकर आटपायच्या उद्देशाने भारतीय संघ गोलंदाजीसाठी आला. मधल्या फळीतील खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनाही फार यश आले नाही. बीऊ वेबस्टर आणि कुपर कॉनोलीच्या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची भागिदारी केली. पण ऑस्ट्रेलियाच्याही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. ब्रेंडन डगेटप्रमाणे भारताच्या मुकेश कुमारनेही ऑस्ट्रेलियाचे ६ विकेट्स घेतले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव १९५ धावांवर आटपला. सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८८ धावांची आघाडी घेतली, पण आघाडी फार मोठी नव्हती. भारताला दुसऱ्या डावात मोठी खेळी करून सामन्यात पुनरागमन करण्याची संधी होती.
भारताने संधीचा फायदा उचलला आणि मोठी खेळी करत सामन्यात पुनरागमन केले. दुसऱ्या दिवसाअंती भारताने २ विकेट्स गमावत २०८ धावा उभारल्या आणि भारताने सामन्यात १२० धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड (५) व अभिमन्यू ईश्वरन (१२) धावांवर बाद झाले. तर साई सुदर्शन (९६) व देवदत्त पडिक्कल (८०) धावांसह शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी मोठी धावसंख्या उभारून सामन्यात मोठी आघाडी घ्यावी लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.