IND A vs AUS A: भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेंडू छेडछाड? इशान किशनलाही अंपायरने भरला दम; नक्की प्रकरण काय?

Umpires accused India A players of ball-tampering: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चार दिवसीय सामना खेळणाऱ्या भारतीय संघावर अंपायर्सकडून चेंडू छेडछाडीचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, जाणून घ्या.
India A vs Australia A
India A vs Australia ASakal
Updated on

India A vs Australia A unofficial Test: भारतीय अ संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध चार दिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला ७ विकेट्सने पराभवाचा धक्का बसला.

पण याबरोबरच चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला (रविवार, ३ नोव्हेंबर) भारतीय संघावर चेंडूशी छेडछाड करण्याचाही आरोप झाला आहे. यामुळे अंपायरने सामन्यादरम्यान चेंडूही बदलला.

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ८६ धावांची गरज होती. त्यावेळी खेळ सुरू होण्यापूर्वी भारतीय अ संघाचे खेळाडू मैदानावरील अंपायर शॉन क्रेग यांच्याशी चेंडूबद्दल चर्चा करताना दिसले होते.

चौथ्या दिवशी जो चेंडू अंपायरने भारतीय संघाकडे सोपवला, त्या बदलल्या चेंडूबद्दल भारतीय खेळाडूंनी अंपायरला प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांच्यातील संभाषण स्टंप माईकमध्येही कैद झाले.

India A vs Australia A
IND vs NZ 3rd Test : Rishabh Pant वर रोहित शर्मा एवढा का खवळला? ड्रेसिंग रूममधील Viral Video चा सर्वांना बसलाय धक्का
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.