IND A vs AFG A : भारत-अफगाणिस्तान सामन्यात थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, पाहा नेमकं काय घडलं

IND vs AFG ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup : इमर्जिंग आशिया कप ट्वेंटी-२० स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला २० धावांनी पराभूत केले.
IND vs AFG
IND vs AFGesakal
Updated on

IND vs AFG ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup : इमर्जिंग आशिया कप ट्वेंटी-२० स्पर्धेत भारत अ संघाने उपांत्य फेरीत निराशजनक कामगिरी केली. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताने २० धावांनी पराभव पत्कारला. उपांत्य फेरीत अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत २०६ धावांची मोठी मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय संघ ७ वकेट्स गमावून १८७ धावाच करू शकला. यावेळी अफगाणिस्तानच्या डावात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

टीम इंडियाला सलामीवीर सेदिकुल्लाह अटल आणि झुबाईद अकबरी यांची १३७ धावांची भागीदारी १५ व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. १५ व्या षटकात अकिब खानने पहिला चेंडू यॉर्कर टाकला, जो झुबाईद अकबरीच्या पल्ल्यात आला नाही. चेंडूला हलकीशी बॅटची कडा लागली आणि यष्टिरक्षक प्रभसिमरन सिंगने झेल केला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले. पण पंचानी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

पंचानी बाद न दिल्यामुळे भारताकडून तिसऱ्या पंचांकडे अपील करण्यात आले आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय भारताच्या बाजूने दिला. यानंतर अफगाणिस्तानचा फलंदाज झुबाईद अकबरी संत्पत झाला आणि त्याने मैदान सोडण्यास नकार दिला.ओमानमधील अल अमेरत क्रिकेट स्टेडियममध्ये डीआरएस (डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम) नसल्यामुळे झुबाईद या निर्णयावर प्रचंड संतापला होता.

तोपर्यंत प्रकरण शांत होते, पण अफगाणिस्तानच्या कोचिंग युनिटने झुबाईदला मैदान सोडण्यास नकार दिल्याने वाद वाढला. एका क्षणी, भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांचे कोचिंग स्टाफ वाद घालताना दिसले.

IND vs AFG
IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.