IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Border Gavaskar Trophy : मायदेशात न्यूझीलंडकडून झालेल्या दारूण पराभवानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात असं कमबॅक करेल, याची अपेक्षाही कुणी केली नव्हती.
IND vs AUS 1st Test
IND vs AUS Perth Testesakal
Updated on

India vs Australia 1st Test Day 4: जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थ कसोटी गाजवली. एक जलदगती गोलंदाज कर्णधार असेल तर डावपेचात झालेले बदल, दिसतातच... जसप्रीतने सातत्याने त्याच्या जलदगती गोलंदाजांचा वापर करताना ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ठेवले. भारताने दमदार कामगिरी करून ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी लोळवले. भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावरील सर्वात मोठा विजय ठरला. पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या जसप्रीतने दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजच्या ३ व वॉशिंग्टनच्या २ विकेट्सने विजयात हातभार लावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.