India vs Australia 1st Test Day 4: भारतीय संघाने पर्थ कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. पहिल्या डावात सर्वबाद १५० धावांच्या घसरगुंडीनंतर दुसरा डाव ६ बाद ४८७ धावांवर घोषित करण्यापर्यंतची टीम इंडियाची भरारी ही अविश्वसनीय होती. पण, यजमान ऑस्ट्रेलियाला ते जमले नाही आणि त्यांचे ४ फलंदाज अवघ्या १७ धावांवर माघारी परतले.