India vs Australia 1st Test : यशस्वी जैस्वालच्या दमदार खेळीला ब्रेक लावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ कसोटीत पुनरागमनासाठी जोर लावताना दिसतोय. यशस्वी १६१ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर भारताची गाडी घसरली आणि ८ धावांत ३ विकेट्स पडल्या. .यशस्वी जैस्वालने त्याच्या चारही कसोटी शतकांचे रुपांतर दीडशेपार खेळीत करून एक वेगळा विक्रम नोंदवला आहे. कसोटीत पहिल्या चार शतकांच्या मोठ्या खेळीत रुपांतर करणारा तो ग्रॅमी स्मिथ याच्यानंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यशस्वी व लोकेश राहुल यांनी २०१ धावांची विक्रमी भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणले. मिचेल मार्शने ही भागीदारी तोडली. लोकेश १७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ७७ धावांवर बाद झाला. .देवदत्त पडिक्कल २५ धावांवर माघारी परतला. पण, यशस्वी मैदानावर फटकेबाजी करत उभा राहिला. त्याने पर्थवर सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या आशियाई फलंदाजाचा विक्रम नावावर केला. यापूर्वी हा विक्रम आसिफ इक्बाल ( १३४ नाबाद, पाकिस्तान, १९७९) यांच्या नावावर होता..IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी.कसोटी क्रिकेटमधील यशस्वीची ही चौथी १५०+ धावांची खेळी ठरली. या विक्रमात वीरेंद्र सेहवाग ( १४), सुनील गावस्कर ( ११) हे आघाडीवर आहेत. यशस्वीने आज गौतम गंभीर व मुरली विजय ( ४) यांच्याशी बरोबरी केली. २३ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ४ वेळा १५०+ धावा करणारा यशस्वी हा जावेद मियाँदाद व ग्रॅम स्मिथ यांच्यानंतर तिसरा फलंदाज ठरला. या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन (५ ) अव्वल स्थानी आहेत. यशस्वी जैस्वाल २९७ चेंडूंत १५ चौकार व ३ षटकारांसह १६१ धावांवर बाद झाला. भारताला ३१३ धावांवर तिसरा धक्का बसला. ऋषभ पंतला ( १) घाई महागात पडली अन् नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न फसला. लायनने मुद्दान चेंडू वाईडच्या दिशेने फेकला अन् यष्टिरक्षकाने त्याला यष्टिचीत केले. .पॅट कमिन्सने भेदक मारा करून ध्रुव जुरेलला ( १ ) पायचीत केले. अम्पायर कॉलमुळे ध्रुवला तंबूत जावे लागले. ३१३ धावांवर भारताला तिसरा धक्का बसला आणि ३२१ धावांपर्यंत आणखी दोन फलंदाज माघारी परतले होते. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.