India vs Australia: कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. सराव सामन्यात अंगठा फ्रॅक्चर करून बसलेला शुभमन गिलही २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीला मुकणार आहे. KL Rahul दुखापतीतून सावरला असून तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत सलामीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अशात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन नेमकी कशी असेल, याची उत्सुकता लागली आहे.