Border Gavaskar Trophy 2024-25 : भारताने ज्याप्रमाणे दबावात विकेट्स गमावल्या, त्याच दबावात ऑस्ट्रेलियन फलंदाज खेळताना पाहायला मिळत आहे. वेगवान गोलंदाजांना मदत होत असलेल्या पर्थवरील खेळपट्टीवर बुमराहने कमाल करून दाखवली. हर्षित राणाने हेडची दांडी गुल केली. तर पहिल्या धावेसाठी २४ चेंडू घेणाऱ्या मार्नस लाबुशेन आणि मोहम्मद सिराजमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली.