IND vs AUS: डेव्हिड वॉर्नर सोडा, १९ वर्षांचा ओपनर टीम इंडियाला घाम फोडणार! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑसी कोचचे संकेत

India vs Australia Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात वर्ल्ड कप गाजवणाऱ्या १९ वर्षांच्या खेळाडूलाही संधी मिळू शकते.
Sam Konstas | India vs Australia
Sam Konstas | India vs Australia Sakal
Updated on

Border - Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेची उत्सुकता नेहमीच चाहत्यांमध्ये दिसून येते. आता लवकरच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जाणार असल्याने त्याबाबत चर्चाही सुरू झाल्या आहेत.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ खेळण्यासाठी भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणाही झाली आहे. पण अद्याप ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली नाही.

या वर्षाच्या सुरुवातीच डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजासोबत सलामीसाठी स्टीव्ह स्मिथचा पर्याय वापरून पाहिला. मात्र, सलामीला खेळताना स्मिथला फारसं यश मिळालं नाही.

Sam Konstas | India vs Australia
IND vs AUS: वॉर्नरला भारताविरुद्ध खेळायचंय, पण कमिन्सनं करेक्ट शब्दात केला कार्यक्रम; म्हणाला...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.