Kuldeep Yadav ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघातून का वगळलं? खरं कारण आलं समोर

Border-Gavaskar Trophy 2024-25: नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी BCCI ने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
kuldeep yadav
kuldeep yadavesakal
Updated on

Kuldeep Yadav Dropped From Test squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी दरम्यान भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे भारतीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मागच्या काही काळापासून दुखापतीमुळे चर्चेत असलेल्या मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर न्युझीलंडविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा भाग असणाऱ्या कुलदीप यादवलाही संघातून वगळण्यात आले आहे.

कुलदीपने बेंगळुरू येथील न्युझीलंडविरूद्धचा पहिला कसोटी सामना खेळला. पण भारताला त्या सामन्यात आठ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पण, पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीपच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी देण्यात आली. वॉशिंग्टन सुंदरने मिळलेल्या संधीचे सोने केले आणि सामन्यात ११ विकेट्स मिळवले.

बासीसीआयने निवेदनात स्पष्ट केले की, कुलदीपला संघातून वगळणे हा रणनीतीचा भाग नसून त्याला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. "कुलदीप यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीसाठी अनुपलब्ध होता. कारण त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मांडीच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठवण्यात आले होते," असे बासीसीआयच्या निवेदनात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात पर्यायी सलामी फलंदाज म्हणून अभिमन्यू ईश्वरनला संधी देण्यात आली आहे. या वर्षभरात देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अभिमन्यू सातत्याने चांगली कामगीरी करत आहे. त्यामुळे अभिमन्यूला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. कदाचीत या मालिकेत अभिमन्यू आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पाहायला मिळू शकतो.

india squad agaisnt australia
india squad agaisnt australiaesakal

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.