Mohammad Shami Bengal Team : भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतीय संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप फायनलनंतर दुखापतीमुळे शमी मैदानाबाहेरच आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याचे खेळणे अपेक्षित होते, परंतु त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली आणि त्याला ही मालिका खेळता आली नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून त्याचे पुनरागमन शक्य नसल्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले होते.
रोहितच्या विधानापूर्वी शमीने त्याचा सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण, त्याला खेळवण्याची घाई आम्हाला करायची नाही, असे रोहित व संघ व्यवस्थापनाचे म्हणणे होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघातून त्याचे नाव गायब राहिले.