IND vs AUS Womens ODI Series : उदयोन्मुख स्टार फलंदाज जॉर्जिया वॉलला ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे. ती पुढील महिन्यात भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेत पदार्पण करेल. अशातच कर्णधार ॲलिसा हिलीला गुडघ्याच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांच्या या मालिकेला मुकावे लागणार आहे. ॲलिसा हिलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ताहलिया मॅकग्राथ ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहे. ॲलिसा वेलिंग्टनमधील न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करेल अशी शक्यता आहे.