IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Border Gavaskar Trophy 2024-25: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी दोन्ही संघांकडून एकूण १७ विकेट्स घेतले गेले. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने १० आणि भारताने ७ विकेट्स घेतले.
australian bowlers
australian bowlersesakal
Updated on

Australian Bowling Quartet Creates History: ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पर्थ कसोटीतील पहिल्या डावात इतिहास रचला. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड आणि नेथन लायन या चौघांनी ऑस्ट्रेलियासाठी आज विक्रमी कामगिरी केली. क्रिकेटच्या इतिहासात एकत्रित ५०० कसोटी विकेट्स घेणारे हे पहिलं गोलंदाजी युनिट ठरलं.

बॉर्डर गावस्कर सामन्याला आजपासून सुरूवात झाली. पर्थमधील पहिल्या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाज फार काळ मैदानावर टीकू शकले नाहीत. भारताचा डाव ऑस्ट्रेलियाने १५० धावांवर गुंडाळला. ज्यामध्ये जोश हॅझलवूडला ४ विकेट्स घेण्यात यश आले. तर, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतले.

australian bowlers
AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.