पर्थ, ता. २० (पीटीआय) ः भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी असलेली खेळपट्टी गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे व्यवस्थितपणे तयार करता आलेली नाही. परिणामी खेळपट्टीवर तयार होणाऱ्या भेगा या वेळी नसतील, परंतु चेंडूला अधिक उसळी आणि वेग असेल, असा अंदाज खेळपट्टी तयार करणारे क्युरेटर इसाक मॅकडोनाल्ड यांनी व्यक्त केला आहे.